सोनाक्षी ही सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. काही काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर पार पडला. तिच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नादरम्यानचे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या हनीमूनच्या फोटोंची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. तसेच अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. अशातच आता सोनाक्षीने लग्नानंतर काही दिवसातच काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. (sonakshi sinha viral video)
लग्नाच्या गडबडीनंतर सोनाक्षी पुन्हा एकदा कामाकडे वळली आहे. सध्या अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट ‘काकुडा’मुळे चर्चेत आहे. बुधवारी या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळी ती पती झहीरबरोबर दिसून आली. झहीर तिला पाठिंबा देण्यासाठी तिच्याबरोबर उपस्थित असलेला दिसून आला. यावेळी दोघांचाही पेहराव अधिक चर्चेत राहिला. या ठिकाणी सोनाक्षीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचा कोट व काळ्या रंगाचा चष्मा लावलेली दिसून आली. तसेच झहीरनेही बेज रंगाचा शर्ट, फिकट पांढऱ्या रंगाची पॅंट परिधान केली होती.
झहीर व सोनाक्षी जेव्हा एकत्र आले तेव्हा दोघंही खूप सुंदर दिसत होते. सुरुवातीला दोघंही भेटल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकमेकांचा हात पकडून फोटोसाठी पोज देऊ लागले. दोघांच्याही स्टायलिंगची मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. मात्र सोनाक्षीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. एका नेटकऱ्याने लिहिले की, “लग्नाला अजून एक महिनाही झाला नाही आणि ही अवस्था आहे”, दुसऱ्या नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “लग्न झालेल्यांसारखे तरी दिसा”.
दरम्यान, सोनाक्षीच्या नवीन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर रितेश देशमुख, साकीब सलीम, गरविल मोहन असे इतर कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट १२ जुलै २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.