मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा टीझर प्रदर्शित, चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 25, 2025 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
krantijyoti vidyalaya marathi madhyam teaser

शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’चा टीझर प्रदर्शित, चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी

krantijyoti vidyalaya marathi madhyam teaser : मराठी शाळांची घटती संख्या, खालावलेली पटसंख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाची कमी होत जाणारी आवड या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडेच हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाचा प्रचंड मनोरंजक असा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे यांचे विषय हे नेहमीच तुमच्या आमच्या घरातले असतात आणि म्हणूनच ते प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटतात. त्यामुळे आता या चित्रपटात पुन्हा एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली शाळा आणि मग त्या काळातल्या सगळ्या आठवणी पाहायला मिळणार हे नक्की. हा चित्रपट प्रेक्षागृहात आपलं मनोरंजन करणार यावर या टीझरने शिक्कामोर्तब केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीझरमध्ये दिसतेय की, मराठी शाळा बंद होण्याच्या संकटात सापडली असताना, जुने विद्यार्थी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेला भेट देतात. या भेटीनंतर सुरू होते ती, त्यांच्या शाळेतील आठवणींची, नात्यांची आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाची नवी सफर. दिग्दर्शक हेमंत ढोमे यावेळेस प्रेक्षकांना आपल्या शालेय जीवनाची सफर घडवणार आहे. यात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा – वडिलांना शेवटचं पाहताना लेक भावुक, धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी ईशा देओलच्या अश्रूंचा बांध फुटला

लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ शाळा हा आपल्या आयुष्याचा पाया असतो. आपण घडतो ते शाळेतच. पहिली भिती, पहिला राग, पहिली मेत्री, पहिलं प्रेम हे सारंकाही आपण शाळेतच अनुभवतो. त्यामुळेच मराठी शाळेचं हे भावविश्व रंगवताना प्रेक्षकांना त्यांच्या शाळेतल्या आठवणी अनुभवायला मिळतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करत मराठी शाळांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मी केला आहे मला खात्री आहे प्रेक्षकांना आपली शाळा आठवणार आणि मराठी शाळा पुन्हा भरणार.”

आणखी वाचा – झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार, भावुक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख

येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत. या सर्वांनी मिळूनच झिम्मा आणि झिम्मा २ या चित्रपटांची निर्मिती केली होती.

Tags: hemant dhomekrantijyoti vidyalaya marathi madhyammarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
riteish deshmukh news

"तुझ्या प्रत्येक मॅचेसमध्ये…", लेकाच्या ११ व्या वाढदिवसाला रितेश देशमुखच भावुक पत्र, म्हणाला, "तुझ्यामुळे शिकलोय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.