मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. निवडक पण लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या हेमांगीने मालिका, नाटक व सिनेमे केले असून डान्स व कॉमेडी शोजमध्येही हेमांगीने आपली जादू दाखवली, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. त्याचबरोबर हेमांगी तिच्या बिंधास्तपणामुळेही ओळखली जाते. एखादा सामाजिक मुद्दा असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग, हेमांगी याबद्दल सोशल मीडियावर आपले रोखठोक मत मांडताना दिसते. यासह ती यावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. (Hemangi Kavi post)
विविध माध्यमांतून वेगवेगळी भूमिका करणारी हेमांगी लवकरच स्टार प्रवाहावरील ”मन धागा धागा जोडते नवा” मालिकेत दिसणार असून ती अॅड. गायत्री वर्तक ही भूमिका साकारणार आहे. तशी माहिती तिने आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामद्वारे दिली. फोटोजमध्ये हेमांगी वकिलाच्या वेशात दिसत असून ह्या फोटोजसह हेमांगीने एक पोस्टसुद्धा केलीये. ज्यात तिने जुन्या आठवणी जागत ही भूमिका आपल्या बाबांना समर्पित करत असल्याचं म्हटलंय.
पहा काय म्हणाली हेमांगी पोस्टमध्ये (Hemangi Kavi post)
हेमांगी पोस्टमध्ये म्हणाली, “See you in Court ! माझे बाबा एलएलबी (वकिल) होते पण घरच्या परिस्तिथीमुळे practice न करता त्यांना नोकरी धरावी लागली. पण त्यांचा हा वकिलीचा अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आणला किंवा असं म्हणूया तो नकळतपणे येत होता. कंपनीच्या संपाच्या वेळेस, कंपनीच्या Union मध्ये, कधी कधी तर वैयक्तिक समस्या घेऊन बरेच लोक त्यांच्याकडे कायदेशीर सल्ले मागायला यायचे आणि माझे ‘पप्पा’ जणू त्यांच्याकडे आलेल्या एखाद्या professional case सारखी त्यांच्या मित्रांना, कामगारांना, ओळखीच्या लोकांना विना मुल्य मदत करायचे. त्यावर माझी ‘मम्मी’ typical बायको सारखी कायम बोलायची, “या मदतीचे किमान पैसे तरी घ्या, का उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” त्यावर ते वकिली उत्तर देत म्हणायचे “वकिलीची शपथ घेतली नाही तर मी कुणाकडून पैसे कसे घेणार? मी जर असे पैसे घेतले तर माझ्यावरच केस होईल. नाही का?” त्यावर बिच्चारी माझी मम्मी case मध्ये हरलेल्या client सारखी गप्प व्हायची.”

“आम्ही भावंडं भांडायला लागलो की माझं मुद्देसुद बोलणं ऐकून माझी आई नेहमी म्हणायची rather अजूनही म्हणते वकिलाची मुलगी शोभतेस खरी ! सध्या मी STAR Pravah च्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारतेय. माझ्या बाबांनी कधीच आमच्यावर त्यांचा वकिलीचा वारसा जपण्याची इच्छा लादली नाही ! उलट आम्हांला जे आवडेल, झेपेल तेच शिकू दिलं ! आवडतं क्षेत्र निवडू दिलं ! पण आज मला असं वकिलाच्या Band आणि Gown मध्ये पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला असता हे नक्की ! माझ्या Acting Career चा महत्त्वाचा खांब असणाऱ्या माझ्या ‘पप्पांना’ माझ्या सर्व भूमिका समर्पित आहेतच पण Advocate Gayatri Vartak ही भूमिका खास तुमच्यासाठी पप्पा !”
हे देखील वाचा : “एकचं अंगठी देऊन प्रपोज आणि साखरपुडा” हेमांगी ने शेअर केला पहिल्या valentine चा किस्सा