बॉलीवूडमधील ‘हिरामंडी’ या चित्रपटाला खूप लोकप्रिया मिळाली आहे. या चित्रपटातील सर्वांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या या कलाकृतीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. मनीषा कोइराला, शेखर सुमन, फरीदा जलाल यांनी या चित्रपटामधून अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यातील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणजे जेसन शाह. जेसनने या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्याच्या बाबतीत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. जेसनला दारू व सेक्स करण्याची सवय लागल्याची माहिती मिळाली होती. ( jason shah on his habits)
जेसनला या सर्व गोष्टींची सवय लागल्याची त्याला जाणीव झाल्यानंतर त्याने अध्यात्माचा मार्ग निवडला होता. याबाबत त्याने ‘शार्डूलॉजी’ या चॅनलसमोर बोलताना त्याच्या सवयीबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले की, “मला सेक्सची सवय लागली होती. ही खूप वाईट सवय होती. माझ्यासाठी हे सगळं सोडणं खूप मोठी गोष्ट होती”. जेव्हा त्याला विचारले की, “या सवयी कशा मोडल्या?” त्यावर त्याने उत्तर दिले की, “देव खूप चांगला आहे आणि त्यांच्या कृपेने माझ्याकडे पुरेसं आहे की देवाच्या प्रेमापुढे हे सगळं कमी पडलं. या सवयी कोणासमोर सांगूदेखील शकत नाही. त्यामुळे या सवयी सोडणं सोपंदेखील नाही”.
पुढे तो म्हणाला की, “हे खूप कठीण आहे. या प्रक्रियेतून जाताना तुम्हाला उत्तरं द्यावी लागतात. जर चांगलं वाटत असेल तर ते मान्य करा पण मला जाणीव झाली की हा खूप चुकीचा सल्ला आहे. माझ्या आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर मी चुकीचे निर्णय तेव्हाच घेतले जेव्हा मला सगळं छान वाटत होतं. आता मला हेच सांगायचे आहे की जर तुम्हाला चांगले वाटत असेल तर त्याबद्दल नक्की विचार करा”.
जेसनला सेक्सची सवय लागली आहे हे तेव्हा समजले तेव्हा मी माझ्या मित्रांच्या घरी होतो आणि नेहमीप्रमाणे मुलीला बाहेर जाताना पाहिले. मला त्या मुलीला हर्ट करताना खूप वाईट वाटलं. त्यानंतर मी धार्मिक होण्याचा विचार केला. तसेच सध्याच्या नात्यावर भाष्य करताना तो म्हणाला, “जोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही तोपर्यंत आम्ही सेक्स न करण्याचा निर्णय घेतला आहे”.