‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय पात्र रोशन सिंह म्हणजे गुरुचरण सिंह बेपत्ता झाला होता. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांमध्येही भीतीचे वातावरण झाले होते. तो जवळपास महिनाभर बेपत्ता होता. गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला रवाना होणार होता. मात्र तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे २६ एप्रिल रोजी समोर आले. दिल्ली विमानतळावर तो दिसला पण त्यानंतर तो कुठे गेला हे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
यादरम्यान घरी परतल्यानंतर अभिनेत्याने खुलासा केला होता की, तो धार्मिक यात्रेला गेला होता. संसाराचा त्याग करुन तो घरातून निघून गेला. या २५ दिवसांत तो कधी अमृतसर तर कधी लुधियाना येथे होता. या दिवसांत त्याने अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये मुक्काम केला होता. अभिनेता अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या ऐवजी ‘तारक मेहता…’मध्ये त्याची भूमिका दूसरा कलाकार साकारत आहे. अशातच या मालिकेत तो पुन्हा दिसणार का? याबद्दल त्याने भाष्य केलं आहे.
अभिनेता ०६ जुलै रोजी मुंबई विमानतळावर दिसला, अनेक महिन्यांनंतर तो मुंबई शहरात पहिल्यांदा दिसला. यावेळी पापाराझींशी त्याने संवाद साधला. यावेळी अभिनेत्याला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी त्याला पैसे दिले आहेत का?, असा प्रश्न विचारला. यावर गुरुचरणने “हो. निर्मात्यांनी जवळपास सर्व पैसे दिले आहेत” असं म्हटलं.
गुरचरण सिंगच्या चाहत्यांना शोमधील त्याचे पात्र खूप आवडले होते. त्यामुळे तो मालिकेत परत येईल का? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुके त्याच्या या शोमध्ये पुन्हा येण्याबद्दल अभिनेता म्हणाला, “देव जाणो! परमेश्वराला माहीत आहे, मला काहीच माहीत नाही. मला कळताच, मी तुम्हांला कळवीन”.
दरम्यान, गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला रवाना होणार होता. मात्र तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे २६ एप्रिल रोजी समोर आले. दिल्ली विमानतळावर तो दिसला. पण त्यानंतर तो कुठे गेला हे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मग २५ दिवसांनी तो पुन्हा आपल्या घरी सुखरूप परतला.