शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पुरण सिंह यांची जागा घेणार गोविंदाची पत्नी?, म्हणाली, “कृष्णा-कश्मीराचा राग येतो कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2024 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Govinda Wife Reaction On Kapil Sharma Show

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा भाचा कृष्णाबरोबरच्या नात्याबाबत मोठा खुलासा

गोविंदा व त्याचा भाचा कृष्णा अभिषेक नेहमीच त्यांच्या नात्यामुळे, नात्यातील वादामुळे चर्चेत असतात. गोविंदा व कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोक्याचे आहेत की गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांच्या संपर्कात आलेले नाहीत. या वादावर आता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने केलेलं भाष्यही चर्चेत आलं आहे. सुनीता आहुजाचे कृष्णा अभिषेक व कश्मिरा शाहबरोबर चांगले संबंध नाहीत. आणि आता तिने याचा खुलासाही केला आहे. गोविंदाच्या पत्नीला त्यांच्या या नात्याबाबत विचारताच तिने अगदी मनमोकळेपणाने यावर भाष्य केलं. (Govinda Wife Reaction On Kapil Sharma Show)

अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल शर्माच्या शोबद्दल सांगितले. तिला अर्चना पूरण सिंगची जागा घ्यायची आहे का असे विचारले असता तिने कश्मिरा व कृष्णा अभिषेकचा उल्लेख करत प्रश्नाचे उत्तर दिले. ‘टाईम आऊट विथ अंकित पॉडकास्ट’मध्ये सुनीता आहुजाला विचारण्यात आले होते की, “ती कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरण सिंहची जागा घेणार का? भविष्यात तिला ऑफर आली तर ती घेणार का?”. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “माझं काश्मिरा व कृष्णाबरोबर जमत नाही”. “असे का?”, असे विचारले असता सुनीता आहुजा यांनी याला कौटुंबिक कलह म्हटले आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत चर्चा करण्यास काही तास लागतील असे सांगितले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : इरिनाबरोबर मैत्रीपलीकडे होतं नातं?, वैभवने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “आमच्या दोघांचा स्वभाव…”

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

सुनीता पुढे म्हणाली की, “जेव्हा तिच्याकडून चूक होते तेव्हा ती माफी मागायला कमी पडत नाही, पण जर तिची चूक नसेल तर ती त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडेही पाहत नाही”. याच पॉडकास्टमध्ये सुनीता आहुजा म्हणाली, “मी गेल्या १५ वर्षांपासून माझ्या बहिणींचे चेहरे पाहिलेले नाहीत. एकदा मनात द्वेष निर्माण झाला की तो माझ्यासाठी संपत नाही”.

आणखी वाचा – Video : रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय व लेक आराध्याने एकमेकींना केलं किस, बच्चन कुटुंबिय मात्र दोघींपासून दूर, नेटकरी म्हणाले, “मायलेकी…”

काही महिन्यांपूर्वी कृष्णा अभिषेकची बहीण आरतीच्या लग्नाला गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी भाचीच्या लग्नाला गोविंदाने खास अंदाजात हजेरी लावली. कृष्णाने आरतीच्या विशेष दिवसासाठी त्यांच्या कुटुंबातील एकतेवर विश्वास व्यक्त केला होता. तो म्हणाला होता की, “सगळ्यात पहिलं निमंत्रण हे मामाला देण्यात येईल. तो माझा मामा आहे, आमच्यात काही मतभेद झाले आहेत जो एक वेगळा मुद्दा आहे पण पहिली लग्नपत्रिका त्यांच्याकडे जाईल आणि तो निश्चितपणे लग्नाला उपस्थित राहणार आहे” असंही तो म्हणाला होता.

Tags: bollywood newsGovinda Wife Reaction On Kapil Sharma Showkrushna abhishek and kashmira abhishek
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kartiki Gaikwad first singing show after becoming a mother and shared special post

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.