मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत जे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा डंका गाजवू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये आपले स्थान प्रस्थापित करण्यात अशाच एका अभिनेत्रीचा मुख्य वाटा आहे. ती अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. मराठी मनोरंजन विश्वातील छोटा पडदा असो वा मोठा पडदा असो आजवर गिरिजाने तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर आता ती थेट शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात झळकणार असल्याचं समोर आलं. या तिच्या मोठ्या भरारी दरम्यान तिने नुकत्याच एका पॉडकास्टला मुलाखत दिली, यांत तिने ऑनलाईन खेळ व जाहिराती यांवर स्पष्टच भाष्य केलं. (Girija Oak On Online Rummy)
विषय काहीही असो कलाकार मंडळींना ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो, यांत काही नवीन नाही. आता ही कलाकार मंडळी ट्रोलिंगचा सामना कसा करतात यावर ठरत ते ट्रोलिंग कितपत लांबणार आहे. बरीच कलाकार मंडळी अशी असतात जी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत, तर काही कलाकार असे असतात जे यावर भाष्य करून विषय वाढवणं थांबवतात.
अनेक मराठी कलाकारांनी ऑनलाइन पत्ते खेळण्याच्या जाहिराती केल्या. या कलाकारांना सोशल मीडियावर या जाहिरातींवरून प्रचंड ट्रॉल करण्यात आलं. गिरिजाचा ही या जाहिरातीत सहभाग होता. यावर बोलताना गिरीजा म्हणाली, ‘मी अजूनही त्यावर ट्रोल होते. माझ्या वेगवेगळ्या पोस्टवर पण लोकं त्याबद्दल बोलतात. मी जाहिरात केली कारण मी त्याकडे प्रोजेक्ट म्हणून पाहिलं. मी जाहिरात न करूनही लोकं खेळणं बंद नाही करणार. मी याचा मूल्य वगैरे अशा दृष्टीने विचार केलाच नाही. मी फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करत नाही कारण आपल्या त्वचेचा रंग मुळात आपल्या हातात नाहीये. कारण हे चुकीचं आहे. पण मी रमी खेळा म्हटलं तर मला नाही वाटत त्याने फार फरक पडेल. ‘
पुढे बोलताना गिरीजा म्हणाली, ‘ती तुमची चॉइस आहे. यात तुमची मजबुरी नाही. सक्ती कसली आहे? दारू प्यायची की नाही, तंबाखू खायचा की नाही, रमी खेळायची की नाही हे तुमचे चॉइस आहेत. पण ट्रोलर्सचा किती विचार करायचा हे आपल्यावर आहे.’ असं म्हणत तिने ट्रोलर्सला एकप्रकारे खडेबोलच सुनावले आहेत.