बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बैलाने उचलून मला फेकलं आणि…”, रेश्मा शिंदेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्याने शिंगाने…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gharoghari Matichya Chuli serial fame Actress Reshma Shinde shared the story of being mauled by a bull in a childhood

अभिनेत्री रेश्मा शिंदेने सांगितला लहानपणीचा आठवणीत राहणारा किस्सा, म्हणाली “तेव्हा बैलाने उचलून फेकलं आणि...”

स्टार प्रवाह वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सुरू झाली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १७ मार्चपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे व सुमित पुसावळे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेने आता नवीन वळण घेतलं असून या मालिकेतील मुख्य पात्र असलेले जानकी आणि ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे हे मालिकेमध्ये शेती करताना दिसत आहेत. मालिकेतील या सीनसाठी रेश्मा शिंदेने खास तयारी केली होती. या सीनचं चित्रीकरण आऊटडोअर झाले होते आणि या खास सीननिमित्त रेश्मा शिंदेने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. (Reshma Shinde mauled by a bull)

यावेळी रेश्मा शिंदेने तिची एक लहानपणीची जुनी आठवण शेअर सांगितली आहे. यावेळी रेश्माला लहानपणी एका बैलाने उचलून फेकल्याच्या भयानक प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला बैलाने उचलून फेकलं होतं. मी तेव्हा चार-पाच वर्षांची होते. मामा त्याला चारा टाकायला गेला होता. तर मी त्या बैलाच्या खूपच जवळ गेले होते आणि त्याची शिंगं वगैरे खूप मोठी होती. तर त्याने माझ्या फ्रॉकमध्ये शिंगं घुसवली आणि थेट उडवूनच दिलं. त्यानंतर मला भीती वाटली. पण आता ठीक आहे”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – डीपी व अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्यासह आर्या जाधवला दिलं बर्थडे सरप्राइज, रॅपर खुश, म्हणाली, “जीजू आणि…”

या मालिकेमधील जानकी म्हणजेच रेश्माने नुकतंच लग्न केलं. पवनबरोबर तिने लग्नगाठ बांधली असून या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान ‘घरोघरी मातीच्या चुली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या रेश्मा शिंदेची भूमिका ही साधी, संस्कारी, कुटुंबाला सर्वोच्च स्थान देणारी, कोणत्याही परिस्थितीला धाडसाने सामोरी जाणारी अशी आहे.

आणखी वाचा – आधी भांडण, मतभेद आता सासूबाईंकडून अंकिता लोखंडेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “आमच्या कुटुंबात येऊन…”

मालिकेत सध्या ऐश्वर्या ही तिची जाऊ तिला त्रास देण्यासाठी सतत काही ना काही करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्यामुळे जानकीला तिच्या पती व मुलीसह घराबाहेर पडावे लागले आहे. आता ऐश्वर्याचे सत्य सर्वांसमोर कसे व कधी येणार आणि जानकीची खरी बाजू सर्वांना कधी समजणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत

Tags: marathi actressReshma Shinde mauled by a bullReshma Shinde mauled by a bull in a childhood
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
priyanka chopra husband troll

प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा एलन मस्कला पाठिंबा, पोस्ट पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “तुझ्या नवऱ्याला सांभाळ नाहीतर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.