गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आज बाबा नाहीत पण…”, वडिलांच्या निधनानंतरचा प्रसंग सांगाताना गौरव मोरेचे पाणावले होते डोळे, म्हणालेला, “त्यांची इच्छा…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 24, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav More shared special memory of his first car video viral on social media.

“आज बाबा नाहीत पण...”, वडिलांच्या निधनानंतरचा प्रसंग सांगाताना गौरव मोरेचे पाणावले होते डोळे, म्हणालेला, “त्यांची इच्छा...”

प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाचे स्वप्न असते की, आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. असंच एक बाबांच्या इच्छेसाठी गाडी घेण्याचं स्वप्न होतं गौरव मोरेचं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे अगदी घराघरांत लोकप्रिय झाला. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे गौरवला अमाप लोकप्रियता मिळाली. अशातच त्याने ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली.

या शोमध्ये त्याने त्याच्या बाबांच्या गाडी घेण्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले होते. याबद्दल गौरवने असं म्हटलं होतं की, “बाहेर फिरायला जाताना, नेहमी असं वाटायचं की, आपल्याकडे पण गाडी असली पाहिजे होती. बस, ट्रेनचा प्रवास मला नक्कीच आवडतो. मी आताही तसा प्रवास करू शकतो. पण माझे वडील नेहमी बोलायचे आपल्या घरात चारचाकी पाहिजे. तेव्हापासून मी ठरवलं होतं की, सेकंड हँड असली तरीही आपल्या घरात चारचाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना ज्याच्या घरासमोर कार असते तोच माणूस मोठा वाटत असतो.”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – ३० वर्षांनंतर घडला इतिहास, छाया कदम यांचा चित्रपट पाहून उपस्थित उभं राहून टाळ्या वाजवू लागले अन्…; Cannesमध्ये नेमकं काय घडलं?

याबद्दल पुढे त्याने असं म्हटलं की, “मी एका शोमध्ये काम करत होतो. तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं. गाडी घ्यायचं ठरवलं तेव्हा समोरचा माणूस बोलला दीड लाखात कार देईन. तेव्हा मी त्याला “माझ्याकडे फक्त १ लाख १० हजार आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही”. असं म्हटलं होतं. बाबांची इच्छा होती म्हणून गाडी घेतली. त्यानंतर गाडी आली पण बाबा गेले. केव्हा-केव्हा वाईट वाटतं आज माझे बाबा सोडून सगळेजण माझ्या गाडीत बसतात. पण ठीक आहे. आता नवीन गाडी घेतल्यावर मी बाबांचा फोटो गाडीत ठेवेन. चला असे तरी एकत्र फिरुया असा विचार करून मी माझं समाधान करून घेतो”.

आणखी वाचा – “वयाचं भान ठेऊन काही उपयोग नाही”, नवऱ्यासह डान्स करण्यावरुन बोलणाऱ्यांची ऐश्वर्या नारकरांनी केली बोलती बंद, म्हणाल्या, “हवं तसं जगणं…”

दरम्यान, विनोदाचं अचूक टायमिंग साधत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखलं जातं.  मराठीशिवाय तो हिंदी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये गौरव प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.  

Tags: gaurav moremarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial Update Shekhar Rajadhyaksha has warned of the end of Virochak

नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा अंत, शक्तीही कामी येईना अन्..; शेखर राजाध्यक्षने दिला अंताचा इशारा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.