रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारतीयांनी केलेला कचरा परदेशी पर्यटकाने उचलला; धबधब्यावरील ‘तो’ व्हिडीओ लज्जास्पद, प्रेक्षकांचा संताप

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 25, 2025 | 5:55 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Foreigner Picking Garbage in Himachal

भारतीयांनी केलेला कचरा परदेशी पर्यटकाने उचलला; धबधब्यावरील 'तो' व्हिडीओ लज्जास्पद, प्रेक्षकांचा संताप

Foreigner Picking Garbage in Himachal : सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आणि मुसळधार पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी ही मंडळी आता पर्यटन स्थळांवर गर्दी करु लागली आहेत. विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे नदी, समुद्र, डोंगर, किल्ले, धबधबे या ठिकाणी ही मंडळी फिरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. अशावेळी अनेक पर्यटक या ठिकाणी येत कचरा करून जातात. आपण केलेला कचरा उचलण्याबाबत ते कोणतेही तसदी घेत नाहीत. भारतात बरेचदा विदेशी पर्यटक फिरायला आलेले असतात. मग त्यांच्यासमोर आपल्या देशाची अशी शोभा मांडणं योग्य आहे का?

या सगळ्यात धबधब्याजवळील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण भारतीयांनी धबधब्यावर केलेला कचरा एक परदेशी पर्यटक उचलताना दिसत आहे. या व्हिडीओत एका विदेशी पर्यटकाने केलेली ही कृती प्रत्येक भारतीयाला लाजवणारी आहे. पर्यटनस्थळी, नैसर्गिक ठिकाणी वा गड किल्ल्यांवर कचरा करणे किती चुकीचे आहे याची प्रत्येकाला जाण असायला हवी. हिमाचल प्रदेश मधील कांगडा या धबधब्याजवळील हा व्हिडीओ आहे.

आणखी वाचा –घोडबंदर रोडची वाईट अवस्था, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रवास करताना भडकली, रात्रीचं शूट करुन दोन तासाने घरी पोहोचली अन्…

Shameful a foreign tourist is more concerned about nature’s beauty while local tourists keep shamelessly littering such stunning places. No govt or administration is to be blamed — it’s the people who need to change if we ever want a clean country. Video from Kangra, Himachal. pic.twitter.com/AbZfcG28G8

— Nikhil saini (@iNikhilsaini) July 24, 2025

या ठिकाणी एक पर्यटक धबधब्याजवळील पसरलेले प्लास्टिक रॅपर आणि कचरा उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकताना दिसत आहे. भारतीयांनी केलेला कचरा परदेशी पाहून उचलताना दिसत आहे. आणि त्याचे सोशल मीडियावर भरभरुन कौतुक होताना दिसत आहे. भारतीयांनी ही चूक केली आणि ती त्यांनीच उचलायला हवी होती त्याऐवजी त्या पर्यटकाने उचलली. व्हिडीओ पाहून देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओमध्ये तो पर्यटक असं म्हणत आहे की, “मी दररोज इथे बसून लोकांना कचरा उचलण्यास आणि स्वच्छता ठेवण्यास सांगत आहे”.

आणखी वाचा – “जन्मभूमी बिहार, जिल्हा भोजपुरी…”, परप्रांतीय तरुणाने जिंकली महाराष्ट्रीयांची मनं, म्हणाला, “भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय…”

हा व्हिडीओ @iNikhilsaini नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या. एकाने लिहिले, “एक परदेशी पर्यटक तिथे स्वच्छता करतोय आणि आपलेच लोक घाण पसरवतायत ही फार लज्जास्पद गोष्ट आहे. जर आपल्याला स्वच्छ देश हवा असेल, तर लोकांना त्यांच्या सवयी बदलाव्या लागतील”.

Tags: foreign touristgarbageindian people
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
 Devoleena Bhattacharjee holding her Son

"लहान मुलाला तरी सोडा", दिसण्यावरुन देवोलिनाच्या लेकाला ट्रोल करताच चाहते भडकले, म्हणाले, "नीच आणि विचित्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.