प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी कधी कधी कलाकाराला बराच वेळ लागतो पण काही कलाकार या गोष्टीला अपवाद ठरतात. असच काहीस घडलंय अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या कलर्स मराठी वाहिनी वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिका आणि मालिकेतील कलाकारांसोबत. मालिकेची कथा आणि कलाकार यांच्या कामावर चाहत्यांनी भरभरून प्रेम दर्शवलं आहे. वर्षभरातच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवण्यास मालिकेच्या निर्मात्यांना, कलाकारांना यश आले.(Raj Kaveri Relationship)

भाग्य दिले तू मला या मालिकेतील जोडी हे मालिकेचं प्रमुख आकर्षण ठरली. राज आणि कावेरी म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे या दोघांच्या केमीस्ट्रीने मालिकेत वेगळीच रंगत आणली आहे. याच बरोबर सोशल मीडियावर ही या जोडीचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतोय.
हे देखील वाचा- ‘ एकीकडे शॉर्ट कपडे, मिनी स्कर्ट्स आणि दुसरीकडे द्रौपदी म्हणून जुही चावला ने दिला नकार
या जोडीची लोकप्रियता एवढी आहे की नुकत्याच पार पडलेल्या कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ या सोहळ्यात लोकप्रिय जोडी हा मानाचा पुरस्कार सुद्दा राज कावेरी या जोडीनेच पटकवला.ऑनस्क्रीन या राजवेरीची प्रेमळ जोडी ऑफस्क्रीन ही अशीच असावी असं काही चाहत्यांचा मत आहे आणि या चाहत्यांनी राज कावेरीच्या फोटोवर आपलं हे प्रांजळ मत मांडलं देखील आहे. राज आणि कावेरीने खऱ्या आयुष्यात ही एकमेकांसोबत यावं असं त्यांना स्क्रीनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांचं मत आहे.(Raj Kaveri Relationship)

सध्या मालिकेत राज कावेरीवर आलेलं संकट आणि त्यावर ते दोघे काढत असलेला मार्ग शोधत आहेत. तर सानिया आणि वैदेही याना अजून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघीना राज कावेरीला फसवण्याचा प्लॅन यशस्वी होणार का आणि रत्नमाला राज कावेरीला कशा मदत करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक दिसत आहेत. तर राज कावेरीने खऱ्या आयुष्यात एकत्र यावं असं तुम्हाला ही वाटत का आम्हला कमेंट करून नक्की सांगा.