मराठी चित्रपट सृष्टी म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं हक्काचं ठिकाण. अनेक अभिनेते, अभिनेत्री, गायक यांच्या सदाबहार कलागुणांनी हे मराठी मनोरंजन विश्व् बहरलं आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या कलाकारांच्या यादी मधील एक लाडकी जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ. अभिनयाच्या मोठ्या कालावधीनंतर देखील चाहत्यांच्या मनात या जोडी बद्दल असलेलं प्रेम अद्यापही कमी झालेले दिसत नाही.(Nivedita Saraf London Trip)
सध्या रंगभूमीवर अशोक सराफ यांचं व्हॅक्युम क्लिनर हे नाटक सुरू आहे तर निवेदिता या भाग्य दिले तू मला मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसतात. मालिकांच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढत निवेदिता सराफ या लंडन येथे फिरायला गेल्या आहेत. लंडन मधील अनेक फोटो ही त्यांनी शेअर केले आहेत. पण निवेदिता यांनी नुक्त्याच पोस्ट केलेल्या एका फोटोवर चाहत्याने कमेंट करत अशोक मामानं सोबत एक फोटो काढा ना अशी हटके मागणी केली आहे.

चाहत्यांना हवा आहे लाडक्या जोडीचा नवीन फोटो (Nivedita Saraf London Trip)
निवेदिता यांनी एका कॅफे मधील एक फोटो पोस्ट केला त्यावर चाहत्याने “अशोक मामा बर पण एक फुटू काढा ना” अशी कमेंट करत अशोक सराफ यांच्या सोबत एक फोटो काढा अशी इच्छा व्यक्त केली. सोबतच निवेदिता यांनी पोस्ट केलेल्या या फोटोच अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.
अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केल्यानंतर अशोक – निवेदिता ही जोडी सर्वत्र चर्चेत येऊ लागली. त्यानंतर यांनी एकत्र संसार देखील थाटला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. आता हे दोघे एकत्र कोणत्या नाटकात किंवा चित्रपटात दिसत नसले तरीही ही जोडी अनेकांच्या मनावर राज्य करते.
अभिनयाने एक काळ गाजवणाऱ्या अशोक मामांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे कोणतंही स्क्रिप्ट येत नसल्याची खंत व्यक्त केली होती.(Nivedita Saraf London Trip)