शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Hina Khan Cancer : हिना खानला स्तनाचा कर्करोग, आता अशा परिस्थितीमध्ये आहे अभिनेत्री, म्हणाली, “तिसरी स्टेज सुरु आहे आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2024 | 12:52 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Hina Khan Diagnosed with Breast Cancer in Marath

हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

Actress Hina Khan Health Update : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिना खान स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावरुन चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने सांगितले की, तिच्यावर उपचार सुरु झाले आहेत. आणि सर्वांच्या प्रेमाबद्दल ती आभारी आहे. नुकतीच बातमी आली की हिना खान कॅन्सरने ग्रस्त आहे, पण या बातमीवर क्वचितच कोणी विश्वास ठेवला असेल. मात्र आता जेव्हा अभिनेत्रीने स्वतः तिच्या कर्करोगाचे निदान उघड केले तेव्हा सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसत आहे.

स्तनाच्या कर्करोगाबद्दलबद्दल बोलताना अभिनेत्रीने लिहिले, “माझ्याबद्दल काही अफवा पसरत आहेत. मला एक महत्वाची बातमी तुम्हा सर्वांसह शेअर करायची आहे”. पुढे तिने लिहिलं आहे की, “विशेषतः जे माझ्यावर प्रेम करतात. माझी काळजी घ्या. मला स्तनाचा कर्करोग आहे. हा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यावर उपचार सुरु झाले आहेत. बऱ्याच समस्यांना तोंड देत असूनही मी तुम्हा सर्वांना खात्री देते की मी ठीक आहे. या आजाराशी लढण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. यावेळी, मी स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहे”.

आणखी वाचा – प्रियाने सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, खोटा पुरावा समजून पूर्णा आजींनी तिच्याच कानाखाली लगावली अन्…

View this post on Instagram

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलताना हिना म्हणाली की, यादरम्यान सर्वांनी खासगी आयुष्यातील गोपनीयतेचा आदर करावा. ती म्हणाली, “मला तुमच्या प्रेमाचा, आदराचा अभिमान आहे, पण यावेळी आमच्या गोपनीयतेची काळजी घेतली गेली पाहिजे. मला व माझ्या कुटुंबाला विश्वास आहे की मी कॅन्सरची लढाई जिंकून लवकरच बरी होईन. पण तोपर्यंत थोडी काळजी घ्या. यावेळी मला तुमच्या प्रेमाची व प्रार्थनांची खूप गरज आहे”.

Tags: breast cancerhina khanHina Khan Diagnosed With Breast Cancertv actress breast cancer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerala fame Leela and AJ shared a romantic video on social media know more

Video : लीला-एजेचा रोमँटिक अंदाज, लग्नाच्या रिसेप्शनमधील दोघांच्या लूकने वेधलं लक्ष, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं अधिक लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.