Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती याठिकाणी झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर पूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची ही दुर्घटना बुधवारी सकाळी ९:०० ते ९:१५ च्या दरम्यान घडली. ज्यामुळे सर्वत्र स्तरातून शोककळा व्यक्त केली जात आहे. याशिवाय मराठी मनोरंजनसृष्टीतून ही बहुतेक कलाकारांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रंद्धाजली अर्पण करत भावुक पोस्ट ही शेअर केले आहेत.
यादरम्यान संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका पोस्टमधून नकारात्मक कमेंट करणाऱ्यांची कानउघडणी केली आहे. त्यांनी त्यांचं सोशल मीडिया अकॉउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं, “सोशल मीडियावर बोलताना थोडा संयम ठेवता येईल का?’ ते म्हणाले, ‘सतत नकारात्मक किंवा लोकांना भडकवणारे बोलायलाच पाहिजे असं नाही. काही वेळा… काही क्षण… थोडे संवेदनशीलतेने जगता येईल का? अजितदादा आपले माननीय मुख्यमंत्री होतेच, पण कुणाचे वडील, कुणाचे पती, कुणाचे भाऊ अन् कुणाचे काकासुद्धा होते.” पोस्टच्या शेवटी सलील कुलकर्णी यांनी लिहिले की, ‘कृपया थोडं जबाबदारीने आणि संवेदनशील वागूया.’ याआधी सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांनी दुःख व्यक्त केलं. ‘विश्वासच बसत नाही… अजितदादा.’ ही पोस्ट शेअर करत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात सागर-प्रभूमध्ये जोरदार भांडण; सागर कारंडेचा राग अनावर, म्हणाला, “जास्त आवाज चढवू नको…”
२८ जानेवारी २०२६ ला नेमकं काय घडलं – बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये अजित पवार यांच विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झालं. अपघातग्रस्त ठिकाणचा व्हिडीओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर आणि जळालेलं विमान दिसत आहे. या विमानातून अजित पवार यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि काही जवळचे सहकारी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप विमानतळ प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जात आहे.





