मराठी नाटक, मालिका, चित्रपट व ओटीटी अशा अनेक माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. ‘झेंडा’, ‘क्लासमेट’, ‘झिम्मा’, ‘अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमुळे सिद्धार्थ घराघरांत पोहोचला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता त्याच्या कामाबद्दल व त्याच्या वक्तव्यांबद्दल कायमच चर्चेत राहत असतो. अशातच नुकतीच त्याने कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी त्याने त्याला त्याच्या पत्नी व मित्रांबद्दल Jealousy वाटत असल्याचेही म्हटले.
यावेळी सिद्धार्थला अवॉर्ड किंवा कामाची संधी दुसऱ्याला मिळाली तर त्याबद्दल jealousy असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत सिद्धार्थने असं म्हटलं की, “हो मला खूप jealousy वाटते, मी अजिबातच जळत नाही असं काहीच म्हणत नाही. मी खूप जळतो. मी छान जळतो. पण मी त्या व्यक्तीवर नाही तर त्या व्यक्तीला मिळणाऱ्या गोष्टीवर जळतो. मराठीतील कोणत्याही अभिनेत्याला नोलानबरोबर काम करायची संधी मिळाली तर मी त्या व्यक्तीच्या कामावर नक्कीच jealous होईन. पण त्याला नोलानबरोबर काम करायची संधी मिळाली याबद्दल मी नक्कीच jealous होईन”.
यापुढे त्याने “माझी jealousy व्यक्तीबद्दलची अजिबात नाही आणि आता माझ्याकडे तितका खर्च करायला वेळही नाही. माझी ती विचारपद्धतीच नाही. पण हो मी खूप जळतो” असंही म्हटलं. यानंतर सिद्धार्थने त्याच्या बायकोबद्दल jealousy वाटत असल्याविषयी असे म्हटले की, “माझ्या बायकोला माझ्यापेक्षा चांगली इन्स्टाग्राम डील मिळाली की मला तिच्याबद्दल jealousy वाटतेच आणि ते तिला कायम मिळते. त्यामुळे मी कायमच तिच्यावर जळत असतो.”
यापुढे त्याने त्याच्या jealousy बद्दल असं म्हटलं की, “ललित प्रभाकरचा ‘आनंदी गोपाळ’ चित्रपट आला होता, तेव्हा मला त्याच्याबद्दल jealousy झाली होती की ती भूमिका मलाही मला मिळायला पाहिजे होती. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये वैभव तत्त्ववादीने केलेल्या भूमिकेसाठी मीसुद्धा ऑडिशन दिली होती. पण मी त्यासाठी सिलेक्ट झालो नाही आणि ती भूमिका वैभवने केली. त्यामुळे त्यानंतर त्याचं काम बघून मी जळलो होतो. अर्थात ही jealousy त्या व्यक्तीबद्दलची नसून कामाबद्दलची असते”.