शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बाथटबमध्ये गमावला, जागीच गुदमरुन मृत्यू, परफॉर्मन्स करण्यास जाणार होती पण…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 7, 2024 | 6:06 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
miho nakayama death

जपानी अभिनेत्रीचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह

जपानी मनोरंजन क्षेत्रातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री व गायिका मिहो नाकायामाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून टोकियो येथील घरी मृतावस्थेत सापडली आहे. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. नाकायमा यांना शुक्रवारी एका इव्हेंटला पोहोचायचे होते. मात्र त्या जाऊ शकल्या नाहीत. मात्र त्या घारातील बाथटबमध्ये मृतावस्थेत सापडल्या. त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने याबद्दल माहिती देत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या चाहत्यांना मोठं धक्का बसला असून मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. (miho nakayama death)

नाकायामा यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याबद्दल तपास सुरु आहे. शुक्रवारी ओसाका येथे एका ख्रिसमस पार्टीमध्ये त्या परफॉर्म करणार होत्या. मात्र तब्येत ठीक नसल्याने त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता. त्यांच्या टीमने निधनाची अधिकृत माहिती वेबसाईटच्या माध्यामातून दिली आहे. तसेच त्यांच्या अचानक मृत्यूमुळे सगळ्यांना धक्का बसला असून दु:ख देखील व्यक्त केले आहे.

आणखी वाचा – शशांक केतकरने फिल्मसिटीतील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, म्हणाला, “प्रत्येक कलाकाराला…”

View this post on Instagram

A post shared by MIHO NAKAYAMA (@_miho_nakayama_)

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आम्हा सर्वांना ज्यांनी त्यांची काळजी घेतली आणि त्या सर्व चाहत्यांना ज्यांनी नेहमी त्यांना सपोर्ट केला. अचानक ही घोषणा करताना खूप दु:ख होत आहे. पण ही घटना इतकी अचानक घडली की आम्ही स्वतः खूप हैराण झालो असून दु:खी आहोत. आता त्यांच्या मृत्यूचा  तपास सुरु आहे. लवकरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल”.

आणखी वाचा – पंजाबी-हिंदी रॅपर हनी सिंहच्या आयुष्यावर येणार डॉक्युमेंट्री, या ओटीटी चॅनलवर लवकरच पाहता येणार, चाहते उत्सुक

नाकायामा या १९८०-९० च्या दशकात अधिक प्रकाशझोतात आल्या. १९९५ साली त्यांचा ‘लव्ह लेटर’ हा चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला. तसेच ‘टोक्यो वेदर’ या चित्रपटामध्येदेखील दिसून आल्या होत्या. संपूर्ण कारकिर्दीत  नाकायामा जपानमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक बनल्या. चित्रपट टेलिव्हिजन, व संगीतक्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. 'लव्ह लेटर' मधील त्यांच्या अभिनयाने त्यांना ब्लू रिबन अवॉर्ड्स आणि होची फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. तसेच या चित्रपटाने टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पुरस्कार जिंकले. नाकायामा यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे.
Tags: deathjapanese actressmiho nakayamapassed away
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
kranti redkar viral video

Video : क्रांती रेडकरच्या मुलींना उत्तम संस्कार देते तिची आई, या वयातही नातींसाठी तितकाच उत्साह व मजेशीर अंदाज, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.