शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 1:03 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Famous influencer Anvi Kamdar died after falling into a 300 feet deep gorge know more

रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

अलीकडे प्रत्येकाला सोशल मीडियाचं एक वेगळंच व्यसन लागलं आहे. रिल्ससाठी लोक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा हे व्हिडिओ बनवणं आणि फोटो काढणं धोकादायकही ठरतं. इतकंच नाही तर यामुळं काहींना आपला जीवही गमवावा लागतो. अशातच नुकताच प्रसिद्ध ‘रील स्टार’आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार असं तिचं नाव असून ती मुंबईतील रहिवासी आहे. अन्वी ही तिच्या मित्र-मैत्रिणींसह रायगडमधील माणगावची होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. मात्र त्यावेळीच तिचा पाय घसरुन दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

२७ वर्षांची अन्वी ही उच्च शिक्षित होती. तिच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकजण तिच्या या  आकस्मित निधनाबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.  माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथे राहणारी अन्वी पावसाळ्यात मित्र- मैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती. व्यवसायाने सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) असलेली अन्वी तिच्या सोशल मीडिया रिल्ससाठी प्रसिद्ध होती. अन्वी व तिच्या मित्रांचा एकूण सात जणांचा हा ग्रुप फिरायला गेला. तिथे एका कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती. मात्र तेवढ्यात पाय घसरून तिचा तोल गेला अन् ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – बिग बॉस OTT 3 : अरमान मलिकसह त्याच्या पत्नीवर आहेत लहान मुलीवरील गंभीर अत्याचाराचे आरोप, तक्रारीची पोस्ट व्हायरल

या घटनेनंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरु केली. दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर तब्बल ६ तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं. ती गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आणखी वाचा – मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल

दरम्यान, या घटनेअनंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये तिच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले जात असून तिला श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे. तसेच रीलच्या नादात अनेकजण आपला जीव गमावतात. एक रील करण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जाताना दिसतात, जीवावर उदार होऊन जोखीम पत्करतात याबद्दल टीकादेखील केली आहे.

Tags: Anvi KamdarAnvi Kamdar Death NewsFamous Influencer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Sharayu Sonawane

नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली 'पारू' फेम शरयू सोनावणे, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.