Dharmendra Passed Away : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (२४ नोव्हेंबर) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने उपचार सुरू होते. १० नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ते व्हेंटिलेटरवरही होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील उपचारांसाठी त्यांना जुहू येथील निवासस्थानी हलवण्यात आले. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची दुःखद बातमी समोर आली.
आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव जुहू विलेपार्ले (पश्चिम) येथील स्मशानभूमीत नेण्यात आलं असून, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडण्यात येत आहेत. यावेळी देओल कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, सोशल मीडियावरून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ईशा देओल स्मशानभूमीकडे जाताना दिसत आहे. वडिलांच्या निधनाने ईशाची ही उपस्थिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘पारू’ मालिकेत SHOCKING TWIST! चेन्नई ट्रेनमध्ये आदित्यचा गंभीर अपघात; पारूवर ओढवलं नवं संकट
धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना अनेक कलाकार व चाहत्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या अभिनयाची, साधेपणाची आणि मनमिळाऊ स्वभावाची आठवण सर्वांच्या हृदयात कायम राहणार आहे.





