Devoleena Bhattacharjee Religion : ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. विशेषतः देवोलिना तिच्या लग्नानंतर अधिक चर्चेचा भाग ठरली. कारण देवोलिनाने शाहनावज शेखशी लग्न केले. देवोलिना आणि शाहनावज यांचे लग्न त्यांच्या अनेक चाहत्यांना खटकले. अलीकडेच अभिनेत्री तिच्या पतीसमवेत पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये दिसली. येथे तिने धर्म आणि रमजानमध्ये रोझा ठेवण्याविषयी भाष्य केलं. लग्नानंतर अभिनेत्री नेमक्या कोणत्या धर्माचे अनुसरण करते?, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आणि अखेर देवोलिनाने याचे उत्तर या पॉडकास्टदरम्यान देत अनेक चर्चांना पूर्णविराम दिला.
पारसने देवोलिनाला विचारले की, आपण लग्नानंतर कोणता धर्म पाळता?. यावर देवोलिनाचा नवरा म्हणाला, “आम्ही कधीही एकमेकांना यासाठी भाग पाडले नाही”. देवोलिना म्हणाली, “असे नव्हते की आपण माझ्या धर्माचे अनुसरण करावे किंवा मला माझ्या धर्माचे त्यांना अनुसरण करावे लागेल. आम्हाला हे देखील माहित होते की ते मुस्लिम आहेत आणि मी हिंदू आहे”. पुढे ती म्हणाली, “जर तुम्हाला एखादे नातेसंबंध वाढवायचे असेल तर तुम्हाला यासाठी आधीच तयार असावे लागेल वा अशी सकारात्मकता ठेवावी लागेल, कि उद्या जर एखाद्या आव्हानाला, परिस्थितीला तोंड द्यावे लागले तर तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. म्हणून मी माझ्या मनात अगदी स्पष्ट होते की मी जे अनुसरण करते त्याचेच मी अनुसरण करेन. आणि त्याचेही (पतीचे) म्हणणेही तसेच होते. आम्ही कधीही एकमेकांना भाग पाडले नाही. याबद्दल कधीही चर्चादेखील केली नव्हती”.
आणखी वाचा – “कुत्रे लोक भुंकणारच”, गोविंदाच्या पत्नीचं वादग्रस्त विधान, म्हणाली, “आमच्या नात्याबद्दल…”
पारसने रोजा बद्दल देवोलिनाशी भाष्य केलं. यावर देवोलिना म्हणाली, “मी गेल्या वर्षी रोझा ठेवला होता. मी मोठ्या रोझामधून एक मोठा रोझा ठेवला होता. हा रोझा मी शाहनावझसाठी ठेवला होता. शाहनावझने मला रोझा ठेवण्यास कधीही जबरदस्ती केली नाही. तो स्वत: म्हणत होता की जर तू रोझा ठेवण्यास सक्षम नसशील तर नको ठेवूस. त्याचवेळी माझी शस्त्रक्रिया देखील झाली होती म्हणून मला ऍसिडिटीचा त्रास प्रदीर्घाने जाणवत होता”.
“मी खाण्याशिवाय जगू शकते परंतु पाणी पिण्याशिवाय हे कठीण आहे. मी एकादशीचे उपवास करते ज्यात मी पाणीही पिते आणि फळेही खाते. म्हणूनच मी एक दिवस रोझा ठेवून पाहिला. परंतु, नंतर मी माफीही मागितली आणि म्हटलं की मी हा रोझा पुन्हा ठेवू शकणार नाही. हे खूप कठीण आहे”.