शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Cannes च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री नव्हे तर श्वानाचीच हवा, उपस्थितही बघतच बसले अन्…; कोण आहे हा मेस्सी?,

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 16, 2024 | 3:13 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
cannes festival dog entry

Cannes च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री नव्हे तर श्वानाचीच हवा, उपस्थितही बघतच बसले अन्...; कोण आहे हा मेस्सी?,

‘मेट गाला’नंतर आता ‘कान फेस्टिवल’ चर्चेत आला आहे. जगभरातील अनेक कलाकार या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. वेगवेगळ्या तऱ्हेचे ड्रेस कलाकार परिधान करतात. या ड्रेसची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यावर्षी कान्स फेस्टिव्हलसाठी भारतातील ऐश्वर्या राय, कियारा आडवाणी सहित अनेक कलाकार हजर झाले आहेत. याआधीही या कलाकारांनी कान फेस्टिव्हलमध्ये आपल्या अदांनी घायाळ केले आहे. पण यावेळी कोणी अभिनेता-अभिनेत्री नाही तर एका वेगळ्या कारणामुळे कान फेस्टिव्हलची चर्चा होत आहे. प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेऊया. (cannes festival dog entry)

बॉलिवूड, हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आतापर्यंत कान फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावर्षीदेखील या फेस्टिव्हलमध्ये कलाकार हिस्सा घेतात. पण यावेळी अशा एका कलाकाराने हजेरी लावली ज्यामुळे इतिहासात एक नवीन नोंद झाली आहे. पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर एका श्वानाने एंट्री केली. श्वानाच्या एंट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – रजनीकांत यांच्या लेकीचा मोडला संसार, लग्नानंतरही दोघांचंही दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुरु होतं अफेअर, बारमध्ये जायचे अन्…

Un can en Cannes.

Te queremos, Messi 🐶❤️#Cannes2024pic.twitter.com/pxsClJOzYK

— Carla ❁ (@shannonlada) May 15, 2024

रेड कार्पेटवर आलेल्या श्वानाचे नाव मेस्सी आहे. मेस्सी ऑस्कर विनर चित्रपट ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच त्याने एक कलाकार म्हणून कान्स फेस्टिव्हलसाठीही हजेरी लावली. श्वाना रेड कार्पेट वॉक केले असून फोटोसाठी पोजही दिल्या आहेत. तसेच फ्रेंच रिवेराच्या कार्पेटवर वॉक करणारा पहिला श्वान अशी त्याची नोंद झाली आहे. श्वान जेव्हा पोज देत होता तेव्हा त्याने दोन पावलावर उभे राहून आपल्या पंजांनी गर्दीला अभिवादन केले. तसेच मेस्सी दातांमध्ये सेल्फी स्टिकही घेऊन आला. त्याच्याबरोबर ट्रेनर लॉरा मार्टिनादेखील होती.

आणखी वाचा – अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव सात वर्षांनी अर्जुन ओळखणार का?, अमोल मुलगा असल्याचं सत्य लवकरच समोर येणार

‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ या चित्रपटाचा प्रीमियर मागील वर्षी कान्स फेस्टिव्हलमध्ये झाला होता. २०२३ साली मेस्सीला पाम डॉगचा किताब मिळाला होता. हा किताब पत्रकारांच्या फेस्टिव्हलमध्ये श्वानासाठी दिला जातो. मेस्सीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “सर्वात गोड रेड कार्पेट इव्हेंट”, दुसरा नेटकरी लिहितो की, “आतापर्यंतचा सर्वात बेस्ट रेड कार्पेट इव्हेंट”.
कान्स फेस्टिव्हल या वेळी २५ मे रोजी होणार आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, शोभिता धुलीपाला, अदिती राव हैदरी, कियारा आडवाणी, विराज गेहलानी, शरण हेगडे असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

Tags: cannescannes festivaldogdog entry
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Balasaheb Thackeray's grandson Aishwarya will make his debut in the entertainment industry

‘ठाकरे’ घराण्यातील ‘ही’ व्यक्ती राजकारणात नव्हे तर चित्रपट क्षेत्रात करणार एंट्री, लवकरच मोठ्या चित्रपटाची  घोषणा करणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.