गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तुम्ही देखील दररोज सकाळी चहा-बिस्कीट खाताय? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते; आजच व्हा सावध कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 10, 2025 | 6:26 pm
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
Chai Biscuit in Morning Good or Bad

तुम्ही देखील दररोज सकाळी चहा-बिस्कीट खाताय? मग ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते

Chai Biscuit in Morning Good or Bad: आपल्या देशात चाचे असंख्य चाहते आहेत. अनेक लोक सकाळी चहाच्या वेळी बिस्कीट खाणं पसंत करतात. अनेकांना हा सकाळच्या नाश्त्यासाठी हलका आणि आरोग्यदायी पर्याय वाटतो. पण ही सवय जितकी आपल्याला सामान्य वाटते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चहा बिस्कीट एकत्र खाल्याने पचनसंस्था, रक्तातील साखर, शरीरातील चयापचय यंत्रणा यावर थेट परिणाम करते आणि यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. चहाबरोबर बिस्कीट खाणं हे किती घातक ठरू शकतं हे आज आपण जाणून घेऊया.

बाजारात मिळणारी बिस्किटे हे बहुतेक मैदा, जास्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ज यापासून बनवली जातात. अशातच चहाबरोबर बिस्कीट खाल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते आणि याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच उपाशीपोटी चहा प्यायल्याने त्यातील कॅफिन आणि टॅनिन हे घातक पोटातील आम्ल वाढवतात. शिवाय बिस्किटातील रिफाईंड पीठ आणि साखर ऍसिडिटी आणि जळजळ वाढवते. तसेच सकाळी सगळ्यात आधी गोड आणि रिफाईंड कार्ब्स असलेली बिस्किटं खाल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि अचानक कमी होते. ही सवय दीर्घकाळापर्यंत इन्सुलिन रेजिस्टेंस आणि मधुमेहाचं कारण बनू शकते.

आणखी वाचा: लेकाच्या जन्मानंतर कतरीना कैफ दिसतेय अशी, नवऱ्यानेच सांगितलं खरं कारण, म्हणाला, “पुरेशी झोप नाही…”

चहा बिस्कीट यांचं एकत्र सेवन केल्याने आतड्यातील चांगले बॅक्टरीया कमकुवत होतात. यामुळे पचनसंस्थेची क्षमता कमी होते आणि पोटात जडपणा, गॅस व ब्लोटिंग होऊ लागते. याशिवाय चहामधील टॅनिन शरीरात पाण्याची कमतरता वाढवते. तसेच बिस्किटमध्ये फायबरचं प्रमाण कमी असल्याने बद्धकोष्ठता आणि पोट नीट साफ न होणे यांसारख्या समस्या उदभवतात. रिफाईंड पीठ, साखर आणि अपायकारक चरबी असलेली बिस्किटे सकाळी खाल्ल्यास शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी चहासोबत बिस्कीट खाल्ल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी, सकाळची सुरुवात तुम्ही अशा पेयाने करू शकता जे तुमच्या पोटाचे आरोग्य आणि मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत करेल. अशा वेळी तुम्ही चहा बिस्किटांऐवजी बडीशेपचं पाणी, धण्याच्या बियांचं पाणी, कोरफडीचा रस किंवा नारळ पाण्यात दालचिनी मिक्स करून तुमच्या सकाळची सुरुवात करू शकता.

आणखी वाचा: “हा आजार मलाच का झाला?”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ अभिनेत्री कॅन्सरच्या निदानाबाबत पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, “काही उपचार नाहीत…”

Tags: healthlifestyletea and biscuit bad habits
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Madhav Abhyankar wedding

"आमचं दुसरं लग्न…", 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईकांची लव्हस्टोरी, म्हणाले, "फेसबुकवर बोलत होतो पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.