सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करने नवऱ्यासह रुग्णालयातच साजरी केली ईद, सासऱ्यांकडून मिळाली खास भेट, अभिनेत्रीची तब्येत आता…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2025 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dipika kakar News

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करने नवऱ्यासह रुग्णालयातच साजरी केली ईद, सासऱ्यांकडून मिळाली खास भेट, अभिनेत्रीची तब्येत आता…

dipika kakar News : टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या तब्येतीमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच अभिनेत्री स्टेज २ यकृत कर्करोगाने ग्रस्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे उपचारासाठी अभिनेत्रीला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. आणि यावर उपाय म्हणून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता अभिनेत्रीची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली असल्याचं समोर आलं आहे आणि तिला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, ७ जून रोजी दीपिका आणि तिचा नवरा शोएब इब्राहिम यांनी रुग्णालयाच्या खोलीतच ईद साजरी केली.

शोएब इब्राहिमने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हे पाहायला मिळत आहे की, या कठीण काळातही तिचे कुटुंब सण साजरा करत हा दिवस संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, “दीपी (दीपिका) आणि माझ्यासाठी पपांकडून ईदी आली आहे. ईदच्या खूप शुभेच्छा”. चाहत्यांना दीपिका व शोएबचे ईद साजरीकरण फार आवडले आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या दीपिकाची तिचे सासरचे कुटुंब घेत असलेली काळजी पाहूनही चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

६ जून रोजी शोएबने एक ब्लॉग शेअर केला, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना दीपिकाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आणि तिच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले. दीपिकासाठी प्रार्थना केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. शोएब म्हणाला, “उद्या ईद-उल-अजहा आहे आणि आज इतक्या शुभ दिवशी, दीपिका आयसीयूमधून बाहेर आहे. ती आयसीयूमधून बाहेर आली आहे आणि आमच्याबरोबर आहे, याबद्दल मी खरोखर आभारी आहे. ती तीन दिवस आयसीयूमध्ये होती आणि शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती सुधारत आहे. संध्याकाळी डॉक्टरांनी तिला खोलीत हलवण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया मोठी असल्याने ती काही दिवस येथेच राहील, ती १४ तास ओटीमध्ये होती”.

आणखी वाचा – लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…

दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून हे शेअर करत म्हटले की, जसे की आपल्या सर्वांना हे माहित आहे की गेला काही आठवडा आमच्यासाठी अवघड आहे. ओटीपोटाच्या वरच्या भागाच्या तीव्र वेदनांनी रुग्णालयात जावे लागले. मग आपल्या यकृतामध्ये टेनिस बॉल आकाराचे ट्यूमर आहे हे समजले आणि नंतर हे माहित झाले की हा ट्यूमर दुसर्‍या टप्प्यातील कर्करोग आहे. आमच्यासाठी ही सर्वात कठीण वेळ आहे जो आम्ही पाहिला आणि अनुभवला आहे. मी त्यास सामोरे जाण्यासाठी आणि संपूर्ण धैर्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक आहे. इंशाल्लाह. माझे कुटुंबही यावेळी माझ्याबरोबर आहे आणि आपण सर्वजण सतत प्रेम आणि आशीर्वाद पाठवत आहात. मी यातून नक्कीच बाहेर पडेन. इंशाल्लाह. आशीर्वाद देत राहा”.

Tags: dipika kakar Newsentertainmenttelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Usha nadkarni in hospital

हृदयाचे ठोके कमी झाले, ८ दिवस आयसीयुमध्ये अन्..; उषा नाडकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, रुग्णालयात उपचार सुरु असताना...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.