Dipika Kakar and Shoaib Ibrahim Divorce : दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम ही जोडी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. दीपिका आणि शोएब अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले पाहायला मिळतात. दोघेही ‘ससुराल सिमर का’ मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यांनतर दोघांमध्ये प्रेम झाले आणि बराच काळ रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२३ मध्ये या जोडप्याने मुलगा रुहानचे स्वागत केले. ते YouTube वर त्यांच्या व्लॉगमार्फत चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. काही दिवसांपासून दीपिका व शोएब यांच्या घटस्फोटाच्या अफवा कानावर येत होत्या त्यानंतर दोघांनी ही घटस्फोटाची चर्चा अफवा असल्याचं म्हटलं आहे.
शोएब इब्राहिमने त्यांच्या व्लॉगमध्ये पत्नी दिपिका कक्करला असे काही विचारले ज्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतला आहे. या व्हिडीओमध्ये शोएब दीपिकाला विचारत आहे की, “तू मला सांगितले नाही की इंडस्ट्रीमधील आणखी एक विवाह मोडत आहे आणि हा विवाह आमचाच आहे”. यावर दीपिका म्हणाली, “मी तुला का सांगू? मी हे सर्व एकांतात करणार आहे”.
आणखी वाचा – सायली संजीवचं मालिकाविश्वात कमबॅक?, म्हणाली, “नकारात्मक भूमिका…”
त्यानंतर शोएबने आपल्या कुटूंबाला सांगितले की, ही तर एक ब्रेकिंग बातमी आहे. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना घटस्फोटाचे अहवाल दाखवले. हे पाहून प्रत्येकजण हसू लागला. शोएबने पुन्हा विनोद करत दीपिका यांना सांगितले, “रमजानचा महिना जाऊद्या मग आपण यावर चर्चा करु”. दीपिका आणि शोएब यांचे २०१८ मध्ये लग्न झाले.
आणखी वाचा – “औरंगजेब उत्तम प्रशासक” म्हणणाऱ्या अबू आझमींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज?
त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दीपिकाने ४ वर्षानंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन केले. ती ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ मध्ये दिसली. परंतु आरोग्याच्या समस्यांमुळे तिने हा कार्यक्रम मध्यभागी सोडला. यावर बरीच चर्चा झाली. दीपिका खोटे बोलत असल्याचा बर्याच लोकांनी दावा केला. शोएबबद्दल बोलायचे झाले तर तो ‘झलक दिखला झा सीझन ११’ मध्ये होता, परंतु तो शो जिंकू शकला नाही.