शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद ओकला इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन मिळतं?, प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाला, “माझा सगळा व्यवहार…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 23, 2024 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dharamveer fame Prasad Oak talk about being he is the highest paid actor in the industry know more

प्रसाद ओकला इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन मिळतं?, प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाला, "माझा सगळा व्यवहार..."

सध्या ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. टीझर आल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरु झाली होती. अशातच गेल्या शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर आला. तेव्हापासूनच हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे आणि या चित्रपटामुळे अभिनेता प्रसाद ओकही चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अभिनेता प्रसाद ओकच्या अभिनयाचं भरपूर कौतुक झालं. तर दुसऱ्या भागातदेखील प्रसादचा अभिनय पाहून ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी त्याचं कौतुक केलं होतं.

‘धर्मवीर २’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. त्यामुळे सध्या प्रसाद ओक हा अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. याचनिमित्ताने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रसादला ‘हाययेस्ट पेड अभिनेता’ (सर्वाधिक मानधन घेणारा) असण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने त्याच्या ‘हाययेस्ट पेड अभिनेता’ असण्यापेक्षा मी Highest Viewed (सर्वाधिक पाहिला गेलेला), Highest Read (सर्वाधिक वाचला गेलेला) आहे का? हे जाणून घेण्यात मला रस असल्याचे सांगितले.  

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

आणखी वाचा – Video : राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक झाल्याचे वृत्त खोटे? स्वतः व्हिडीओ शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती, नेमकं प्रकरण काय?

यावेळी प्रसाद असं म्हणाला की, “हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा हाययेस्ट व्ह्यू अभिनेता असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे. मी हाययेस्ट पेड अभिनेता आहे का? हे दोन माणसांना विचारायला पाहिजे. एक म्हणजे मंजिरी ओक, कारण ती माझा सगळा व्यवहार सांभाळते आणि दुसरे म्हणजे मंगेश देसाई जे  ‘धर्मवीर’चे निर्माते आहेत. ही दोन लोकं याबद्दल सांगू शकतील”.

आणखी वाचा – अरमान-कृतिकाच्या ‘त्या’ व्हिडीओवर शिवसेना आमदार मनीषा कायंदेंची कारवाईची मागणी, म्हणाल्या, “अश्लीलतेच्या मर्यादा…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “या प्रश्नाचं उत्तर देताना मला सांगायला आवडेल की, मी हाययेस्ट पेड अभिनेता असण्यापेक्षा आपण हाययेस्ट वह्यूड (Highest Viewed) आहोत का यात मला रस आहे. आपण Highest Read (सर्वाधिक वाचला गेलेला) अभिनेता आहे का?, आपल्याबद्दल लोक किती वाचतात किंवा हाययेस्ट वेड लावणारा अभिनेता आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते. तो मुद्दा महत्त्वाचा नाही”

Tags: marathi actormarathi entertainment newsprasad oak
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial honeymoon special promo out adhipati and akshara enjoying in Thailand

Video : थायलंडमध्ये अक्षरा-अधिपतीचा हनिमून, समुद्रकिनारी जोडप्याचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.