नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी मनोरंजन विश्वात अक्षरश: धुमाकूळ घातला. मराठी मनोरंजन विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचे हिंदीसह अनेक भाषांत रिमेक झाले. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला होता. २०१८ मध्ये जान्हवी कपूर व इशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही. अशातच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.
धर्मा प्रोडक्शनचा नवीन चित्रपट ‘धडक-२’ ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातील फक्त अभिनेत्याची नव्हे तर प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. निर्माता करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली असून या पोस्टखाली “ही गोष्ट थोडी वेगळी आहे. एक होता राजा आणि एक होती राणी… त्यांची जात वेगळी होती… गोष्ट संपली. (‘यह कहानी थोड़ी अलग है, क्योंकी एक राजा था और एक रानी थी, जाति अलग थी… कहानी खत्म।’) असं म्हटलं आहे.
आणखी वाचा –
‘धडक-२’मध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व अभिनेत्री तृप्ती डिमरी हे मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कथानकाची झलकही दिसून येत आहे. ‘धडक’ चित्रपटात जातीवादात अडकलेल्या प्रेमावर भाष्य करण्यात आले होते. अशातच आता पुन्हा एकदा ‘धडक-२’ च्या माध्यमातून करण जोहरचा हा चित्रपट जाती व्यवस्थेवर भाष्य करणार असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा – “रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची…’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला…”
दरम्यान, ‘धडक-२’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल असं जाहीर करण्यात आलं आहे. ‘धडक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले होते. जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आता ‘धडक-२’च्या माध्यमातून तृप्ती दीमरी व सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार दिसणार आहेत.