Devmanus Serial Coming Soon : ‘झी मराठी’ वाहिनी वरील लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेच्या कथानकाच्या प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. ‘देवमाणूस’ नंतर ‘देवमाणूस भाग २’ ने सुद्धा प्रेक्षकांना खूप प्रेम दिलं. या मालिकेत देवमाणूस हे प्रमुख पात्र अभिनेता किरण गायकवाडने साकारलं होतं. या मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिल्यानंतर आता मालिकेचा नवा अध्याय सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना देत सुखद धक्का दिला आहे. देवमाणूस या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आता मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल अकाउंटवरुन ‘देवमाणूस मालिकेचा मधला अध्याय’ सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘देवमाणूस मधला अध्याय’ असे या मालिकेचे नाव असून मालिकेचा उत्सुकता वाढवणारा असा प्रोमो नुकताच समोर आला आहे. “‘मधला अध्याय’ सुरू होणार घरोघरी. ‘देवमाणूस’ परत येतोय खबर आहे खरी!”, असं कॅप्शन देत हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून आता या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. गेल्या दोन भागांमध्ये किरण गायकवाडने मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली, आताही प्रोमोवरुन तरी मालिकेत किरणच देवमाणूस ही व्यक्तिरेखा साकारेल अशी शंका आहे.
आणखी वाचा – “चांगल्या-वाईट आठवणी…” ‘अप्पी आमची…’ मालिका संपताच अर्जुन भावुक, म्हणाला, “एकदा संपलं की…”
डॉ. अजितकुमार देव भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. जेवढं या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं, तितकाच या भूमिकेचा तिरस्कार देखील केला. विशेष म्हणजे ‘देवमाणूस’ मालिकेचे दोन भाग पाहायला मिळाले. आणि आता तिसरा भाग मालिकेत किती उत्कंठा वाढवणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहील आहे. मालिकेची संपूर्ण कथा डॉक्टर साहेब या खलनायिका भोवती फिरणारी आहे. खलनायक हा मालिकेच्या शेवट पर्यंत हिरोच्या रोल मध्ये असणारी बहुदा ही पहिली मालिका असावी. ज्यामुळे मालिकेच्या दोन्ही भागांमध्ये किरण खलनायक असून सुद्दा प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास यशस्वी ठरला.
आणखी वाचा – दोन घटस्फोटांनंतर आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात, कोण आहे ‘ती’ मुलगी?, फोटो व्हायरल
देवमाणूस मधला देवी सिंग उर्फ अजित कुमार आता नेमका कोण असणार?, किरण गायकवाड पुन्हा या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.