Vaishnavi Kalyankar Mehandi : मराठी मालिकाविश्वात सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहेत. नुकतेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कौमुदी वलोकरच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसले. लवकरच कौमुदी लग्नबंधनात अडकणार आहे. तर एकीकडे शिवा फेम शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. यानंतर आता मालिकाविश्वातील आणखी एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ही जोडी म्हणजे ‘देवमाणूस २’ फेम अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर. किरण व वैष्णवी यांची लगीनघाई सुरु झाली असून त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. वैष्णवीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आलेले पाहायला मिळत आहेत.
वैष्णवी कल्याणकरला किरणच्या नावाची मेहंदी लागली आहे. अभिनेत्रींच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो समोर आले आहेत. यावेळी तिच्या मेहंदीच्या लूकनेही साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. यावेळी वैष्णवीने मेहंदी कलरचा घागरा चोळी परिधान केली आहे. त्यावर सुंदर असा डायमंडचा नेकलेसही तिने घातला आहे. वैष्णवीचा हा मेहंदी लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. वैष्णवी व किरण येत्या १४ तारखेला लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केली.
किरण व वैष्णवी यांनी सोशल मीडियावर थेट प्रेमाची कबुली देत सुखद धक्का दिला. देवमाणूस फेम या जोडीने लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्री मंडळातल्या बैठका होत राहतील. मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो. ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’ वैष्णवी कल्याणकर”, असं कॅप्शन देत किरणने वैष्णवीबरोबरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’मधील कलाकारांनी साजरं केलं कौमुदी वलोकरचं केळवण, लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो तुफान व्हायरल
त्यांच्या या जाहीर कबुलीनंतर सिनेविश्वातून आणि चाहतेमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. आता किरण व वैष्णवी यांच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस २’ मध्ये एकत्र काम केले होते.