Tula Shikvin Changalach Dhada Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणाने ही मालिका एका उंचीवर गेली आहे. सध्या मालिकेत भुवनेश्वरीचं खरं रुप सगळ्यांसमोर आलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई चारुलताचं रुप घेऊन त्यांना फसवत होती. मात्र, अक्षराने वेळीच हुशारीने त्यांचं खरं रुप सगळ्यांसमोर आणलं. भुवनेश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून अक्षराने मोठा खुलासा केला असून अक्षरा भुवनेश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचे अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. एकीकडे अधिपतीही अक्षराच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे ही लढाई ती एकटीच लढताना दिसत आहे.
अक्षरा भुवनेश्वरी विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी बजरंगला जेलमध्ये जाऊन भेटते. भुवनेश्वरीला फक्त सत्ता हवीये याची कबुली बज्या अक्षराला देतो. अक्षरा बजरंगला सूर्यवंशींकडे नेते. अधिपतीसमोर भुवनेश्वरीच्या चुकीच्या कृत्यांची कबुली दे, असं ती बजरंगला सांगते. मात्र, ऐनवेळी तो पलटतो. आणि उलट अक्षराच दबाव आणत असल्याचं तो सर्वांसमोर सांगतो. यामुळे अक्षराची सर्वांसमोर मोठी कोंडी होते. आणि हा सगळा प्रकार पाहून अधिपती अक्षरावर संतापतो.
आणखी वाचा – ‘आई कुठे…’मधील कलाकारांनी साजरं केलं कौमुदी वलोकरचं केळवण, लवकरच अडकणार लग्नबंधनात, फोटो तुफान व्हायरल
अशातच मालिकेत समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, मास्तरीण बाई चिडून अधिपतीला विचारते, “तुमच्या मनात माझं, बाबांचं काहीच स्थान नाहीये का?”. यावर अधिपती म्हणतो, “माझ्या मनात सगळ्यांचं स्थान आहे पण, आमच्या आईसाहेबांचं स्थान सर्वांत मोठं आणि वरचं आहे”. , यावेळी भुवनेश्वरी मध्ये बोलते, “सूनबाई आणि या घराला आम्ही इथे नको आहोत. त्यामुळे आम्हाला निघून जाऊदेत”. यावर अधिपती आईचे पाय धरतो आणि तिला घराबाहेर जाण्यापासून अडवतो. तो म्हणतो, “आईसाहेब तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही आम्हाला हव्या आहात”.
अक्षरा हा सगळा प्रकार पाहून आणखी संतापते आणि रागात म्हणते, “या अशा खोटारड्या व्यक्तीबरोबर मी या घरात राहू शकत नाही. ते मला शक्य नाही”. यावर अधिपती अक्षराला म्हणतो, “तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमचा तुम्ही घ्या”. अधिपतीच्या या बोलण्याने अक्षरा कोलमडते. तर भुवनेश्वरी खूप खुश होते. आता अक्षरा या सगळ्या प्रकारानंतर घर सोडून जाणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.