सध्या कोणत्याना कोणत्या गोष्टी मुळे चर्चेत असणार नाव म्हणजे गौतमी पाटील. गौतमीच्या दिलखेचक नृत्यशैलीचे जितके चाहते आहेत, तितकेच लोक तिला विरोध करताना देखील पाहायला मिळतात.गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्याचं लक्ष वेधून घेते.(Gautami Patil Mother)
कधी गौतमीच्या लग्नाची चर्चा असते, तर कधी तिच्या नावाची. सध्या गौतमी तिच्या कुटुंबामुळे चर्चेचा भाग ठरली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.गौतमीचे वडील गेले १८-२० वर्षांपासून वेगळे राहतात.त्यावरून ही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. तो व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर देखील गौतमीच्या बाजूने असणारे आणि विरोधात बोलणारे दोन गट निर्माण झाले.
पाहा गौतमी आणि गौतमीच्या आईचा खास फोटो (Gautami Patil Mother)
तर आता गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिच्या लहानपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.या फोटोला गौतमीने माझं जग, मी आणि माझी आई असं कॅप्शन दिलं आहे. गौतमीच्या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सेम आई सारखी दिसतेस असं अनेक चाहत्याचं म्हणणं आहे.(Gautami Patil Mother)

लहानपणीच गौतमीचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले.त्यानंतर आईनेच गौतमीचा सांभाळ केला. परिस्थितीमुळे गौतमीला शिक्षण सोडावं लागलं. आईला मदत व्हावी म्हणून गौतमीने तिच्या नृत्यशैलीचा आधार घेतला. आणि आज एक वेगळीच प्रसिद्धी गौतमीला मिळाली आहे.
हे देखील वाचा : गौतमी पाटीलच खरं नाव तुम्हाला माहित आहे का? थेट गौतमीच्या वडिलांनीच केला खुलासा