Sapna Singh Son Sagar Death : ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘माटी की बन्नो’ सारख्या टेलिव्हिजन मालिकांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला सपना सिंहच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र खळबळ पसरली आहे. सपना सिंहच्या १४ वर्षांचा मुलगा सागर गंगवार याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ही घटना बरेली येथे घडली आहे. बरेली येथे सागर त्याच्या मामाच्या घरी राहत होता. सपना सिंह यांचा मुलगा सागर याचा मृतदेह अडलखिया गावाजवळ आढळून आला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटू शकली नाही, परंतु नंतर त्याचे काका ओम प्रकाश यांनी ७ डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर त्याची ओळख पटली.
मुलाच्या मृत्यूने सपनाची अवस्था वाईट झालेली दिसून येत आहे. तसेच नातेवाईकांनी सागरच्या हत्येचा आरोप करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागरचे दोन मित्र अनुज आणि सनी मृतदेह शेतात ओढून नेताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुज व सनीला बुधवारी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. त्याने सागरबरोबर ड्रग्ज आणि मद्यपान केल्याची कबुली दिली, त्यामुळे ओव्हरडोस घेतल्याने तो बेशुद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थितीच्या भीतीने त्यांनी त्याचा मृतदेह शेतात टाकून दिला.
शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही, परंतु विष किंवा अतिसेवन नमूद करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी व्हिसेराचे नमुने पाठवण्यात आले आहेत. रिपब्लिक रिपोर्टनुसार, भुटा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुनील कुमार म्हणाले, “चौकशीदरम्यान, अनुज व सनीने कबूल केले की त्यांनी सागरबरोबर ड्रग्स आणि दारूचे सेवन केले होते. अतिसेवनामुळे सागर बेशुद्ध झाला. घाबरुन त्यांनी त्याचा मृतदेह शेतात ओढून टाकून दिला”.
आणखी वाचा – अनुराग कश्यपच्या लेकीचं थाटामाटात लग्न, भर मंडपात नवऱ्यासह रोमँटिक झाली आलिया, फोटो व व्हिडीओ व्हायरल
दरम्यान जेव्हा सपना मुंबईवरुन बरेलीला परतत असताना तिला मुलाच्या मृत्यूची बातमी समोर आली. मुलाचा मृतदेह बघून ती पूर्णपणे कोसळली. यानंतर आता अभिनेत्रीने तिच्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणीदेखील केली आहे. प्रदर्शने केल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार नोंदवून गहेळी आणि भुता पोलिस स्थानकात दाखल केली आहे.