शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये कसं आयुष्य जगतात मुली?, भारती सिंहने उघडकीस आणलं सत्य, म्हणाली, “आजारी असल्या तरीही त्यांना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 27, 2024 | 7:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bharti singh on daily soap struggle

टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये कसं आयुष्य जगतात मुली?, भारती सिंहने उघडकीस आणलं सत्य, म्हणाली, "आजारी असल्या तरीही त्यांना…"

 टेलिव्हिजन क्षेत्रातील कॉमेडी क्वीन भारती सिंह ही नेहमी चर्चेत असते. ती नेहमी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच तिने आता मनोरंजन क्षेत्रांमध्ये कलाकारांना होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सेटवर काम करताना कलकारांना कोणत्या समस्या येतात तसेच ते कोणत्या परिस्थितिमध्ये काम करतात याबद्दल तिने खुलासा केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  (bharti singh on daily soap struggle)

भारती व तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी स्वतःचा पॉडकास्टही सुरु केला आहे. या पॉडकास्टमध्ये त्यांनी अभिनेत्री प्राची देसाई व अभिनेता मनोज वाजपेयी यांना आमंत्रित केले होते. यादरम्यान मनोज व प्राची यांनी टेलिव्हिजन शो सेटवर दीर्घ काळ काम करण्याबाबत दोघांनीही खुलासा केला. त्यानंतर भारतीने त्यावर आपले मत मांडले आहे. तिने सेटवरील महिला कलाकार हाताला सलाईन लागली असतानादेखील कशाप्रकारे शूट करतात त्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, “मी मुलींना डेली सोपवर सलाईन लावून काम करताना पाहिले आहे. त्यांना घरी जाण्याची परवानगी नसे”.

आणखी वाचा – गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, अभिनयक्षेत्रामधूनही गायब अन्…

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

त्यानंतर हर्षनेदेखील खुलासा करत सांगितले की, “दिग्दर्शकांना त्यांच्या शॉटव्यतिरिक्त कशाशीही देणं-घेणं नसतं. कलाकार किती वाईट परिस्थितिमधून जात आहे याबद्दल त्यांना कोणतीही फिकीर नसते”. तसेच तो पुढे म्हणाला की, “कलाकार खूप कमी तासांची झोप घेऊन सेटवर 15 तास काम करतात. कमी झोप मिळाल्यामुळे त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. लोक चहा पितात, सिगरेट ओढतात, कमी जेवतात, पित्त होते पण यावर ते नियंत्रण ठेऊ शकत नाहीत”. त्यावर प्राचीनेदेखील सांगितले की, “मी जेव्हा टीव्हीवर काम करायचे तेव्हा झोप घालवण्यासाठी रात्रंदिवस कॉफी प्यायचे”.

आणखी वाचा – बायकोच्या सगळ्या बॅग उचलून निघाला कुशल बद्रिके, फोटोही केला शेअर, म्हणाला, “भांडणात ही म्हणाली होती की…”

सध्या प्राची व मनोज त्यांचा आगामी चित्रपट ‘सायलेन्स 2- कॅन यु हियर इट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपटामध्ये साहिल वैद्य, वकार शेख, दिनकर शर्मा व पारुल गुलाटीदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.  

Tags: actressBharti Singhcomedy queendaily soap
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
28 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सर्वार्थ सिद्धी योगमुळे मिथुन, कर्क व तूळ या राशीच्या लोकांना अधिक आर्थिक नफा, तुमच्या नशिबात काय?, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.