बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मानेत ट्युमरची गाठ, अर्धांगवायूचा धोका आणि…; जॉनी लिव्हरच्या मुलाची झालेली वाईट अवस्था, म्हणाले, “उपचारही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 24, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Johny Lever son cancer

मानेत ट्युमरची गाठ, अर्धांगवायूचा धोका आणि…; जॉनी लिव्हरच्या मुलाची झालेली वाईट अवस्था, म्हणाले, "उपचारही…"

Johny Lever son cancer : आपल्या विनोदी शैलीने कायमच रसिक प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे अभिनेते म्हणजे जॉनी लिव्हर. आजवर जॉनी लिव्हर यांनी अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिकांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. व्यावसायिक आयुष्याबरोबरचा जॉनी वैयक्तिक आयुष्यातही बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. जॉनी यांची दोन्ही मुलंही वडिलांपाठोपाठ सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. बरेचदा अनेक इव्हेंटमध्ये त्यांची मुलं त्यांच्याबरोबर स्पॉट होताना दिसतात. जॉनी लिव्हरच्या मुलाला म्हणजेच जेसी लिव्हरला तो लहान असताना गंभीर आजाराचा सामना करावा लागला आहे. डॉक्टरांनीही या आजारावर उपचार करण्यास नकार दिला, अशावेळी त्यांनी मुलावरील उपचार कसे केले याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

जॉनी लिव्हर यांनी अभिनेत्री कुनिका सदानंद हिच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी लेकाच्या आजारपणाच्या कठीण काळाबाबत भाष्य केलं. जॉनी लिव्हर म्हणाले, “माझ्या मुलाला मानेमध्ये गाठ आली होती. त्यासाठी त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले. त्याची शस्त्रक्रियासुद्धा झाली पण डॉक्टर त्याच्या मानेमधून ट्यूमरची गाठ पूर्णपणे काढू शकत नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी ते माझ्या मुलावर उपचार करणार नाहीत. कारण त्यामुळे त्याची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. तसेच त्याला अर्धांगवायूचा धोका निर्माण होईल असंही सांगण्यात आलं होतं. मी माझ्या मुलाला रुग्णालयात असताना पाहिलं आहे. डॉक्टरांनी ट्यूमरची गाठ औषधांनी कमी व्हावी म्हणून त्याला गोळ्या दिल्या होत्या. तो दिवसाला ४०-५० गोळ्या खात असे. पण तरीसुद्धा त्याने काहीच फरक पडला नाही आणि ट्यूमरची गाठ वाढत चालली होती”.

आणखी वाचा – डॉक्टरांनी बरिणीभर गाठी काढल्या, गोळ्यांची एलर्जी आणि…; ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा कठीण काळ, कर्करोगाने त्रासल्या…

View this post on Instagram

A post shared by Jesse Lever (@jesse_lever)

पुढे ते म्हणाले, “तेव्हा तो जेमतेम १२ वर्षांचा होता. शाळेत इतर मुलं त्याची मस्करी करायचे. त्यावेळी मला जमेल ते सगळं मी त्याच्यासाठी केलं. त्याला हवं ते सगळं दिलं. आम्ही यूएसमध्ये न्यू जर्सीला ट्रिपला गेलो होतो. तेव्हा आम्ही सगळ्यांनी चर्चमध्ये जाण्याचं ठरवलं होतं. तिथे एक प्रिस्ट होते. त्यांनी आम्हाला पाहिल्यानंतर जेस्सीबद्दल विचारलं. तेव्हा मी त्यांना माझ्या मुलाच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. त्यांनी मला स्लोन केटरिंग रुग्णालयात त्याला घेऊन जाण्यास सांगितले आणि म्हणाले की, देव त्याला बरे करेल”.

आणखी वाचा – बोनी कपूर यांना ओळखणंही झालं कठीण, बदलता लूक पाहून चाहत्यांनाही धक्का, वजन इतके कमी…

जॉनी लिव्हर पुढे म्हणाले, “भारतात डॉक्टरांनी सर्व काही प्रतिकूल सांगितल्याने माझी पत्नी काळजी करीत होती; पण मी तिची समजूत काढली. माझे जर्सीमध्ये काही चांगले डॉक्टर मित्र होते. त्यांनी मला डॉक्टर जतीन शाह यांना भटण्याचा सल्ला दिला होता. मी फार देव देव करणारा व्यक्ती नव्हतो पण माझ्या मुलासाठी त्या काळी देवाकडे खूप वेळा प्रार्थना करत असे. शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी खूप काळजीत होतो पण डॉक्टरांनी मला त्याची शस्त्रक्रिया नीट झाल्याचं सांगितलं. त्यांनी त्याची ट्यूमरची गाठ काढली होती”.

Tags: bollywood gossipjessy lever cancerjohny lever
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Tanushree Dutta Troll

तनुश्री दत्ताने मुंबई पोलिसांना टोकले, भ्रष्ट म्हटलं आणि…; ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावरही भडकली, म्हणाली, "माझा वेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.