Shivaji Satam Commented On The Exit : ‘सीआयडी’ (CID) ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ही मालिका गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेचा नवा सिझनही काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेतील पात्रांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. प्रत्येक पात्र आजही त्यांच्या खास डायलॉगने ओळखलं जातं. दरम्यान हा शो अलीकडे एका धक्कादायक खुलास्याने चर्चेत आला. कालपासून सीआयडीबाबत एक बातमी समोर येत होती की, एसीपी प्रदुमन हे पात्र ‘सीआयडी’मधून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापूर्वीही हे पात्र काही काळ मालिकेत दिसले नव्हते, मात्र या पात्राने जोरदार कमबॅक केलं आणि रसिकांची मन जिंकली. आता पुन्हा, हे पात्र निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. यावर एसीपी प्रद्युमन ही भूमिका साकारणारे शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी भाष्य केलं आहे.
‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत, शिवाजी साटम यांनी भाष्य केले की, “सध्या ते रजेवर आहेत”. शिवाय मालिकेतील निरोपाच्या वृत्तांबद्दल त्यांना माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबद्दल शिवाजी साटम म्हणाले की, “हे पात्र शोमधून बाहेर पडेल की नाही याबद्दल मला वैयक्तिक काही माहित नाही. सध्या मी सुट्टीवर आहे आणि आनंद घेत आहे. मला सीआयडीच्या आगामी चित्रीकरणाबद्दल माहिती देण्यात आलेली नाही”.
आणखी वाचा – CID च्या एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात शिवाजी साटम?, एकूण कमाई होती…
सीआयडी मधील ‘कुछ तो गडबड है’ हा त्यांचा डायलॉग तर तुफान व्हायरल झाला. शिवाजी साटम यांना जगभरात एसीपी प्रद्युमन हीच ओळख मिळाली असून या पात्राने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. दरम्यान, हे मुख्य पात्रच शोमधून बाहेर पडलं तर मग मालिका बघण्यात काही रस नाही, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांकडून समोर आल्या. त्यामुळे आता ‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू होणार का?, ते निरोप घेणार का?, हे येत्या भागांमधून स्पष्ट होईल.
सूत्रानुसार असे समोर आले आहे की, “संघाने अलीकडेच हा भाग शूट केला आहे, जो काही दिवसात प्रसारित होईल. अद्याप याबाबत बरीच माहिती शेअर केलेली नाही कारण निर्मात्यांना चाहत्यांना हा मोठा धक्का द्यायचा आहे. या शोच्या पूर्वीच्या भागात, बरीचशी पात्र मरताना दिसली, जी काही काळानंतर परतली. मात्र सूत्रांच्या मते, एसीपी प्रद्युमन यांना परत आणण्याची कोणतीही योजना नाही, मात्र या ट्विस्टननंतर येणाऱ्या प्रतिक्रियेनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो.