चित्रपट निर्माती फराह खान व साजिद खान यांच्या आई मेनका इराणी यांचे आज २६ जुलै रोजी निधन झाले आहे. कमल आर खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ही बातमी शेअर करत माहिती दिली आहे. फराहच्या आईने वयाच्या ७६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फराहने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या आईवर अनेक शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला होता. यानंतर आता हृदय हेलवणारी बातमी समोर आली आहे. १२ जुलै रोजी फराह खानच्या आईचा वाढदिवस होता. फराहने तिच्या आईसाठी एक मनापासून नोट लिहिली होती आणि तिच्या शक्तीचे कौतुक केले होते. (Farah Khan Mother Passed Away)
“आम्ही सर्वजण आमच्या आईला गृहीत धरतो. विशेषत: गेल्या महिन्यात मी माझी आई मेनकावर किती प्रेम करतो याचा खुलासा झाला आहे. ती आजवर पाहिलेली सर्वात मजबूत, धाडसी व्यक्ती आहे. अनेक शस्त्रक्रियांनंतरही तिची विनोद बुद्धी खूप तल्लख आहे”, असे तिने लिहिले होते. “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. घरी परतण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करण्यासाठी तू पुरेशी मजबूत होण्याची वाट पाहू शकत नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे”, असं म्हणत तिने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.