गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’नंतर सागर कारंडेची हिंदी कॉमेडी शोमध्ये एंट्री, कुशल बद्रिके व गौरव मोरेला देणार साथ, प्रोमो समोर

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 1:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chala Hawa Yeu Dya fame Sagar Karande entered in Madness Machayenge comedy show video viral on social media

‘चला हवा येऊ द्या’नंतर सागर कारंडेची हिंदी कॉमेडी शोमध्ये एंट्री, कुशल बद्रिके व गौरव मोरेला देणार साथ, प्रोमो समोर

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या कार्यक्रमामधील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडेसह अंकुर वाढवे आणि अनेक कलाकारांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडेही चांगलाच लोकप्रिय झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर सागरने काही नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्याने काही विनोदी कार्यक्रमातून प्रहसन सादर करत प्रेक्षकांना हसवले. अशातच प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुशल आता सागर पुन्हा एकदा एका हिंदी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सागर सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – ‘बिग बॉस १७’ फेम मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं झालंय काय?

नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सागर कारंडेची खास झलक पाहायला मिळत आहे. सागरने याआधी अनेकदा विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच त्याने याआधीही ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये सागर कारंडेसह अभिनेता भारत गणेशपुरेही होता. ‘चला हवा येऊ द्या’नंतर या दोघांनी ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

आणखी वाचा – आधी सासरी जंगी स्वागत आता लेकीला घेऊन इंटरनॅशनल ट्रीपला निघाली सई लोकूर, नवऱ्यासह एअरपोर्टवरील फोटोही केले शेअर, Photo व्हायरल

अशातच आता सागर पुन्हा एकदा हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमात कुशल बद्रिके, हेमांगी कवी, त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेही सहभागी झाला होता. अशातच आता यांच्यात सागर कारंडेही सहभागी झाला आहे. त्यामुळे सागरचे अनेक चाहते त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.   

Tags: chala hawa yeu dyaMadness Machayengemarathi entertainment newssagar karande
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
janahvi kapoor on dr. ambedkar and mahatma gandhi

“डॉ. आंबेडकरांचे स्पष्ट विचार पण गांधींचे…”, जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “दलित समाजाच्या…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.