मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट हे दोघे जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. काही फेब्रुवारी महिन्यात राधिका व अनंतचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातील सर्व दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. पॉपस्टार रिहाना, मार्क झुकरबर्ग तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. हा सोहळा गुजरातमध्ये थाटामाटात पार पडला. आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळा करणार असल्याचे समोर आले आहे. हा शाही सोहळा क्रुझवर पार पडणार आहे. (ambani pre-wedding ceremony)
अनंत व राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगसाठी १६०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा प्री-वेडिंग सोहळा होणार असून यासाठी ५ स्टार व आलीशान क्रुझ पार्टी होणार आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडमंडळी हजर राहणार आहेत. तसेच जगभरातील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या आलिशान सोहळ्यासाठी जगभरातून ८०० लोक हजर राहणार आहेत. हा सोहळा २८ ते ३० मेपर्यंत हा सोहळा आयोजित केला गेला आहे.

‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार हा सोहळा २९ मे पासून १ मेपर्यंत क्रुझवर होणार आहे. पण या पार्टीमध्ये नक्की काय काय कार्यक्रम होणार आहेत? हे जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी वेलकम लंच व स्टारी नाइट पार्टी होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी रोम शहर फिरण्याचा प्लान आहे. त्यानंतर क्रुझवरच जेवणाचा बेत आहे तसेच टोगा पार्टीदेखील होणार आहे. तसेच चौथ्या दिवशी म्हणजे एक जून रोजी इटलीच्या पॉर्टोफिनो शहर फिरता येणार आहे.

हा प्रवास इटली ते फ्रांस दरम्यान होणार असून जवळपास ४,३८० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. यामध्ये ८०० पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी ६०० लोकांचा स्टाफ असणार आहे. तसेच तेथील किचनदेखील प्रशस्त असून प्रत्येक पाहुण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्यात येणार आहेत. या क्रुझवर एकूण इनसाइड १६९ खोल्या असून आऊटसाइड खोल्यांची संख्या १४७७ आहे. या क्रुझवर एकूण चार स्विमिंग पूल आहेत.