गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भीषण अपघातात एक चमत्कार घडला अन्…; बायकोच्या अपघातानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, सांगितली कशी आहे परिस्थिती?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 25, 2025 | 6:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonu Sood wife Accident

बायकोच्या अपघातानंतर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया

Sonu Sood wife Accident : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा २४ मार्च रोजी उशिरा नागपूर येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. ही बातमी ऐकून प्रत्येकला खूप मोठा धक्का बसला आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांनी तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरवात केली, कारण समोर आलेल्या कारचे चित्र खूप भयानक आहे. ड्रायव्हरशिवाय सोनाली, तिची बहीण आणि भाचा कारमध्ये उपस्थित होते. ही घटना कशी घडली आणि सर्व कसे आहेत याबाबत अभिनेत्याने माहिती दिली आहे. सोनू सूदच्या कुटुंबाच्या अगदी जवळून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर महामार्गाजवळ म्हणजेच समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

सोनू सूद यांनी ‘एटाइम्स’ बरोबर झालेल्या संभाषणात सांगितले की, “हा अपघात नागपूरमध्ये झाला. प्रत्येकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तसे ते ठीक आहेत. एक चमत्कार झाला ज्यामुळे सगळ्यांचा जीव वाचला. नागपूर विमानतळावर सोनू पोहोचला. विमानात बसण्यापूर्वीच कुटुंबियांचा नागपूरमध्ये अपघात झाला. आता सोनूचे कुटुंबिय रुग्णालयातून घरी परतले आहेत. एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे अधिक नुकसान झाले नसल्याचंही समोर आलं आहे.”. ‘हिंदुस्तान टाईम्स’ अहवालात असे म्हटले आहे की सोनालीच्या बहिणीला किरकोळ दुखापत झाली आहे परंतु भाचा आणि अभिनेत्याची पत्नी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ४८ ते ७२ तास आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. परंतु आता ते अस्वस्थ होणार नाही कारण सर्वजण घरी आले आहेत. कारची परिस्थिती पाहून सगळेच घाबरले.

आणखी वाचा – सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, गाडीची परिस्थिती पाहूनच अनेकांना धक्का

सोनू सूदला ही बातमी मिळताच तो नागपूरला पोहोचला. सर्वांना तेथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तथापि, हा अपघात कसा झाला याबद्दल अद्याप काहीच उघड झाले नाही. डिवाइडर किंवा इतर कोणत्याही वाहनाशी कारची टक्कर झाली का याबाबत काहीही माहित नाही. याक्षणी सर्व काही ठीक आहे अशी बातमी आहे.

Tags: entertainemnt newssonu sood wifeSonu Sood wife Accident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Saie Tamhankar In Devmanus Movie

'देवमाणूस’ चित्रपटात सई ताम्हणकरची स्पेशल लावणी, दिसणार ‘या’ खास भूमिकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.