Sonu Sood wife Accident : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा २४ मार्च रोजी उशिरा नागपूर येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. ही बातमी ऐकून प्रत्येकला खूप मोठा धक्का बसला आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांनी तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरवात केली, कारण समोर आलेल्या कारचे चित्र खूप भयानक आहे. ड्रायव्हरशिवाय सोनाली, तिची बहीण आणि भाचा कारमध्ये उपस्थित होते. ही घटना कशी घडली आणि सर्व कसे आहेत याबाबत अभिनेत्याने माहिती दिली आहे. सोनू सूदच्या कुटुंबाच्या अगदी जवळून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर महामार्गाजवळ म्हणजेच समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
सोनू सूद यांनी ‘एटाइम्स’ बरोबर झालेल्या संभाषणात सांगितले की, “हा अपघात नागपूरमध्ये झाला. प्रत्येकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तसे ते ठीक आहेत. एक चमत्कार झाला ज्यामुळे सगळ्यांचा जीव वाचला. नागपूर विमानतळावर सोनू पोहोचला. विमानात बसण्यापूर्वीच कुटुंबियांचा नागपूरमध्ये अपघात झाला. आता सोनूचे कुटुंबिय रुग्णालयातून घरी परतले आहेत. एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे अधिक नुकसान झाले नसल्याचंही समोर आलं आहे.”. ‘हिंदुस्तान टाईम्स’ अहवालात असे म्हटले आहे की सोनालीच्या बहिणीला किरकोळ दुखापत झाली आहे परंतु भाचा आणि अभिनेत्याची पत्नी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ४८ ते ७२ तास आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. परंतु आता ते अस्वस्थ होणार नाही कारण सर्वजण घरी आले आहेत. कारची परिस्थिती पाहून सगळेच घाबरले.
सोनू सूदला ही बातमी मिळताच तो नागपूरला पोहोचला. सर्वांना तेथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तथापि, हा अपघात कसा झाला याबद्दल अद्याप काहीच उघड झाले नाही. डिवाइडर किंवा इतर कोणत्याही वाहनाशी कारची टक्कर झाली का याबाबत काहीही माहित नाही. याक्षणी सर्व काही ठीक आहे अशी बातमी आहे.