रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, गाडीची परिस्थिती पाहूनच अनेकांना धक्का

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 25, 2025 | 3:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonu Sood wife Accident

सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

Sonu Sood wife Accident : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कुटुंबाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार अभिनेत्याची पत्नी आणि काही कुटुंबातील सदस्य रस्ता अपघातात बळी पडले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सोनू सूदच्या कुटुंबाच्या अगदी जवळून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर महामार्गाजवळ म्हणजेच समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. ही घटना मिळताच सोनू सूद नागपूरला रवाना झाला. अशी बातमी आहे की सोनू सूदची पत्नी सोनाली, तिच्या बहिणीचा मुलगा म्हणजे तिचा भाचा आणि तिची बहीण कारमध्ये होते. गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघाताच्या समोर आलेल्या फोटोंवरुन कारच्या कॅरीज उडून गेले असल्याचं दिसत आहे. असे म्हटले जात आहे की गाडीमध्ये उपस्थित असलेल्या सोनू सूदची पत्नी आणि भाचा यांना दुखापत झाली. सोनाली सूद आणि तिचा भाचा मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोघांनाही ४८ ते ७२ तास निरीक्षणामध्ये ठेवले जाईल. स्त्रोताने सांगितले की सोनू सूदला अपघाताची माहिती येताच तो ताबडतोब आपल्या पत्नीकडे जायला निघाला आणि काल रात्रीपासून नागपूरमध्ये होता.

आणखी वाचा – कुणाल कामराच्या एका गाण्याने राडा, माफी मागायलाही नकार, एकनाथ शिंदे म्हणाले, “सुपारी घेऊन…”

अभिनेत्याच्या प्रवक्त्यानेही या बातमीची पुष्टी केली, “होय, सोनालीचा अपघात झाला आहे. अपघाताक्षणी सोनू उपस्थित नव्हता. रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी सांगितले की सोनाली आणि तिचा भाचा यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत आणि पुढील ४८-७२ तास त्यांची काळजी घेतली जाईल. सोनालीच्या बहिणीबद्दल बोलायचेच झाले तर, तिला कोणतीही दुखापत झाली नाही आणि ती फक्त किरकोळ जखमी झाली.

Tags: sonu soodsonu sood wifeSonu Sood wife Accident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Dhananjay Powar On Santosh Juvekar

"खूप ट्रोल होतोय पण त्याला चुकीचं समजून…", धनंजय पोवारची संतोष जुवेकरसाठी पोस्ट, म्हणाला, "त्याचे विचार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.