Sonu Sood wife Accident : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कुटुंबाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार अभिनेत्याची पत्नी आणि काही कुटुंबातील सदस्य रस्ता अपघातात बळी पडले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सोनू सूदच्या कुटुंबाच्या अगदी जवळून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर महामार्गाजवळ म्हणजेच समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला. ही घटना मिळताच सोनू सूद नागपूरला रवाना झाला. अशी बातमी आहे की सोनू सूदची पत्नी सोनाली, तिच्या बहिणीचा मुलगा म्हणजे तिचा भाचा आणि तिची बहीण कारमध्ये होते. गाडीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला.
अपघाताच्या समोर आलेल्या फोटोंवरुन कारच्या कॅरीज उडून गेले असल्याचं दिसत आहे. असे म्हटले जात आहे की गाडीमध्ये उपस्थित असलेल्या सोनू सूदची पत्नी आणि भाचा यांना दुखापत झाली. सोनाली सूद आणि तिचा भाचा मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोघांनाही ४८ ते ७२ तास निरीक्षणामध्ये ठेवले जाईल. स्त्रोताने सांगितले की सोनू सूदला अपघाताची माहिती येताच तो ताबडतोब आपल्या पत्नीकडे जायला निघाला आणि काल रात्रीपासून नागपूरमध्ये होता.
आणखी वाचा – कुणाल कामराच्या एका गाण्याने राडा, माफी मागायलाही नकार, एकनाथ शिंदे म्हणाले, “सुपारी घेऊन…”
अभिनेत्याच्या प्रवक्त्यानेही या बातमीची पुष्टी केली, “होय, सोनालीचा अपघात झाला आहे. अपघाताक्षणी सोनू उपस्थित नव्हता. रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचार्यांनी सांगितले की सोनाली आणि तिचा भाचा यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत आणि पुढील ४८-७२ तास त्यांची काळजी घेतली जाईल. सोनालीच्या बहिणीबद्दल बोलायचेच झाले तर, तिला कोणतीही दुखापत झाली नाही आणि ती फक्त किरकोळ जखमी झाली.