शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला मुस्लिम बनायचं नाही”, शाहरुख खानच्या पत्नीचं ‘ते’ विधान पुन्हा एकदा चर्चेत, म्हणालेली, “धर्म बदलणार नाही कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2024 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
gauri khan on religion

"मला मुस्लिम बनायचं नाही", शाहरुख खानच्या पत्नीचं 'ते' विधान पुन्हा एकदा चर्चेत, म्हणालेली, "धर्म बदलणार नाही कारण..."

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान व पत्नी गौरी खान ही लोकप्रिय जोडी आहे. शाहरुखने आजवर मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९१ साली गौरी व शाहरुख लग्नबांधनात अडकले. शाहरुख मुसलमान व गौरी हिंदू असल्याने त्यांचे लग्न अधिक चर्चेत राहिले. पण गौरी व शाहरुखने या चर्चांवर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. चाहत्यांनी अनेक प्रश्न देखील निर्माण केले. पण कामामध्ये शाहरुखने कामामध्ये कधीही आपले वैयक्तिक आयुष्य येऊ दिले नाही तसेच त्यावर भाष्यदेखील केले नाही. अशातच आता त्याची पत्नी गौरीचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (gauri khan on religion)

गौरी ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी ती कधीही मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही असे म्हणाली होती. तसेच या सगळ्याला शाहरुखचा पाठिंबा असून तो नेहमी समजून घेत असल्याचेदेखील तिने सांगितले होते. हा व्हिडीओ २००५ सालचा आहे. यावेळी तिच्याबरोबर अभिनेता हृतिक रोशन व त्याची पत्नी सुजॅन खानदेखील उपस्थित होती.

आणखी वाचा – सायली-अर्जुनने केला साक्षीचा पर्दाफाश, कोर्टात पुराव्यानिशी केलं सिद्ध, विलास गोळीबारप्रकरणात होणार अटक?

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

यावेळी गौरीने तिच्या लग्नाबद्दल सांगितले. गौरी व शाहरुखच्या लग्नाला गौरीच्या घरच्यांचा विरोध होता. शाहरुख मुसलमान असल्याने घरचे लग्नासाठी तयार नव्हते. पण लग्नानंतर गौरीच्या घरच्यांनी त्यांचे नाते स्वीकारले. आर्यन, सुहाना व अबराम अशी त्यांना तीन मुलं आहेत. दरम्यान शोमध्ये गौरीने सांगितले की, “आर्यन शाहरुखचा खूप आदर करतो. त्यांच्याच धर्माचं पालन करतो.  तो नेहमी मुसलमान असल्याचे सांगतो. मीदेखील शाहरुखचा आदर करते. पण मी माझा धर्म बदलणार नाही. पण कोणीही कोणाच्या धर्माचा अपमान करु नये. शाहरुखदेखील माझ्या धर्माचा कधीही अपमान करत नाही”.

आणखी वाचा – अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला इटलीमध्ये सुरुवात, अंबानी कुटुंबिय असा करत आहेत सगळ्यांचा पाहुणचार, Inside Photos समोर

काही दिवसांपूर्वी शाहरुख ‘डान्स प्लस ५’मध्ये गेला होता. तेव्हा तिथे तो म्हणाला की, “गौरी व मी कधीही हिंदू-मुसलमान अशी चर्चा केली नाही. माझी बायको हिंदू आहे तर मी मुसलमान आहे. पण आमची मुलं मात्र हिंदुस्तानी आहेत”. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच अनेकांनी त्याचे कौतुकदेखील केले होते.

Tags: gauri khanreligionsharukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
makarand deshpande new movie

जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.