शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता”, सुप्रसिद्ध गायकाचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, “ते चुकून…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2024 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood singer Abhijeet Bhattacharya called Mahatma Gandhi not father of the India

बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, “गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता”

प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य नेहमीच आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अभिजीतने एक हजारहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. अभिजीत त्याच्या गाण्यांबरोबरच त्याच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असतो. अभिजीत भट्टाचार्य नुकताच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर दिसला. यावेळी त्याने त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोकळेपणाने भाष्य केलं आहे. अशातच त्याने एक दावा करून वाद निर्माण केला आहे. संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षाही श्रेष्ठ होते. तसंच त्याने महात्मा गांधींना भारताचे नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिताही म्हटलं आहे. (Abhijeet Bhattacharya Controversial Statement on Mahatma Gandhi)

अभिजीत भट्टाचार्य यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “भारत पूर्वीपासून अस्तित्वात होता, पाकिस्तान नंतर भारतापासून वेगळा झाला. पाकिस्तानच्या अस्तित्वाला ते जबाबदार होते. गांधींना चुकून भारताचे राष्ट्रपिता म्हटले गेले.” तसंच “आरडी बर्मन हे संगीत जगतात राष्ट्रपिता होते आणि ते महात्मा गांधींपेक्षा मोठे होते”. गायकाच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना फटकारले आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Bhattacharya (@abhijeetbhattacharya)

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घोषणा आणि तोडफोड करत नुकसान, नेमकं काय झालं?

यावर अनेकांनी टीका करत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिजीतच्या या वक्तव्यावर अनेक नेटकरी संतापले आहेत. अभिजीतच्या या वक्तव्यावर एकजण म्हणाला की, ‘ते राष्ट्रपिता होते की नाही हे ठरवणारा तू कोण?” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “अभिजीतकडून चांगल्या विधानांची अपेक्षा नाही. खुर्चीवर बसून हे लोक फालतू विधानं करत असतात”.

आणखी वाचा – महिलेचा मृत्यू होऊनही थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ बघत राहिला अल्लू अर्जुन, सीसीटीव्ही फुटेज हाती, पोलिसांचा मोठा खुलासा

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अभिजीतच्या या व्यक्तव्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये त्यांनी बॉलीवूडच्या स्टार कलाकारांवरही निशाणा साधला आहे आणि वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. गायकाने सर्वप्रथम त्याला विषय बदलण्यास सांगितले. यानंतर तो म्हणाला, “सलमान खान अजूनही त्या स्तरावर आला नाही की मी त्यांच्याबद्दल चर्चा करू शकतो”.

Tags: abhijeet bhattacharyaAbhijeet Bhattacharya Controversial Statement on Mahatma GandhiAbhijeet Bhattacharya on Mahatma Gandhi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Actress Shivani Sonar pre-wedding rituals started family celebrated her kelvan and she shared special photos social media.

शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.