सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बाप्पाचं विसर्जन करताना स्वप्निल जोशीच्या लेकाला कोसळलं रडू, अभिनेत्याने मुलाला समजावलं पण…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 21, 2023 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swapnil Joshi Son emotional on Ganesh Visarjan

Video : बाप्पाचं विसर्जन करताना स्वप्निल जोशीच्या लेकाला कोसळलं रडू, अभिनेत्याने मुलाला समजावलं पण...; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे, तर काहींच्या घरी नुकतंच दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दीड दिवसाचा बाप्पा असून नुकतंच त्याच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन पार पडले आहे. यावेळी अभिनेताचा मुलगा भावुक झाला होता. (Swapnil Joshi Son emotional on Ganesh Visarjan)

‘तू तेव्हा तशी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत दिसलेला स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षी दीड दिवसाचा बाप्पा विराजमान होतो. दरवर्षी तो त्याच्या घरी बाप्पाची पंचधातूची मूर्ती बसवतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी अभिनेत्याने बाप्पाचे स्वागत केले होते. बाप्पाच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल स्वप्नीलच्या बाप्पाचे विसर्जन झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वप्नील जोशीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्वप्नील बाप्पाचे विसर्जन करताना दिसत आहे. बाप्पाच्या विसर्जनावेळी संपूर्ण कुटुंबीय भावुक झालेले असून त्याचा मुलगा राघव रडलेला दिसला. बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर स्वप्नील, त्याची पत्नी व आई भावुक झालेल्या राघवला समजावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “लहान मुलांचा निरागसपणा खूप भावला… भावना खरोखर आतून आल्यात”. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, “किती छान… मुलांना नाही आवडत बाप्पाचे विसर्जन…मला ही संकल्पना खूप आवडली… मला ही चांदीची मूर्ती घरी आणून असाच पूजाविधी करून विसर्जन करून पुन्हा तोच बाप्पा घरात राहू द्यायला आवडेल”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

हे देखील वाचा – Video : मुकेश अंबानींच्या घरी गणपती दर्शनासाठी बॉलिवूडसह मराठमोळ्या कलाकारांची गर्दी, अंबानी कुटुंबियांचा थाट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

स्वप्नील दरवर्षी बाप्पाची पंचधातूची मूर्ती बसवतो. यामागचं कारण सांगताना तो म्हणाला की, “जेव्हा आम्ही मातीचा गणपती बसवायचो. तेव्हा त्या गणपतीचं विसर्जन करताना काही लोकांनी मला ओळखलं होतं. लोकांच्या गर्दीमुळे बाप्पाच्या मूर्तीला धक्का लागतो का, असं वाटलं होतं. तेव्हा विसर्जन झाल्यानंतर बाबांनी मला बाप्पाची कायमस्वरूपी मूर्ती बसवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून मी पंचधातूची मूर्ती बसवत आहे. गेली ८ ते १० वर्ष आम्ही बाप्पाची पंचधातूची मूर्ती बसवत असून तिच्या प्रातिनिधिक स्वरूपातील स्थापनेनंतर प्रातिनिधिक स्वरूपात विसर्जन करतो. त्यानंतर ती मूर्ती धूऊन पूसून परत घरात ठेवली जाते.”

हे देखील वाचा – गणरायाच्या दर्शनासाठी अर्पिता खानच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सलमान खानसह काढले फोटो, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतंच त्याने प्रार्थना बेहेरेबरोबरच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. लवकरच तो प्रसाद ओक व शिवानी सुर्वेसह ‘जिलेबी’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे करत असून प्रथमच हे त्रिकुट एकत्र काम करताना दिसणार आहे.

Tags: ganesh Chaturthiganeshotsav 2023swapnil joshiSwapnil Joshi Son emotional on Ganesh Visarjan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
new musical movie announcement

‘कट्यार’नंतर लवकरच संगीतमय चित्रपट घेऊन येणार सुबोध भावे, शेअर केला व्हिडिओ, म्हणाला, "प्रयत्नाला यश…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.