Udit Narayan On Viral Video : उदित नारायणचे अलीकडील काही व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यात तो ओठांवर महिला चाहतीला किस करताना दिसला. तेव्हापासून, गायक सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी उदित नारायण यांना खूप सुनावलं आणि ते म्हणाले की, ‘त्यांनी जे काही कमावले ते मातीमध्ये मिसळले’. दरम्यान, उदित नारायण यांचे या चर्चांवर आणि या व्हायरल व्हिडीओवर आता भाष्य समोर आले आहे आणि त्याने महिला चाहतीला ओठांवर किस केल्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. उदित नारायण लाइव्ह शोमध्ये ‘टीप टीप बरसा पाणी’ हे गाणं सादर करत होते त्यावेळी ही घटना घडली.
एक महिला चाहती त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा एका महिला चाहतीने मागे वळून त्यांच्या गालावर किस केले. यानंतर, गायकानेही त्या महिलेच्या ओठांवर किस केले. यानंतर, दुसर्या एका महिला चाहतीने सेल्फी घेण्यासाठी उदित यांना गाठले, त्यानंतर गायकाने तिच्या गालावरही किस केले. आता उदित नारायण यांचा लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान महिला चाहतीला किस घेण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
WTF! what is Udit Narayan doing 😱 pic.twitter.com/Rw0azu72uY
— Abhishek (@vicharabhio) January 31, 2025
यावर आता उदित नारायण यांनी भाष्य केलं आहे. आता ‘एचटी सिटी’शी बोलताना उदित नारायण म्हणाले, “चाहते खूप वेडे आहेत. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. काही लोक त्यास प्रोत्साहित करतात आणि त्याद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. आता काय करावे”. उदित नारायण पुढे म्हणाले, “गर्दीत बरेच लोक असतात आणि आमचे अंगरक्षकही उपस्थित असतात. परंतू चाहत्यांना असे वाटते की, त्यांना भेटण्याची संधी मिळत आहे, म्हणून कोणीतरी हात मिळवण्यासाठी, कोणीतरी हातावर किस करण्यासाठी येतात. त्यामुळे याकडे इतके लक्ष देऊ नका”.
आणखी वाचा – घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, तयारीला सुरुवात, तारीखही समोर
उदित नारायण म्हणाले की, “माझ्या कुटुंबाची प्रतिमा अशी नाही आहे की प्रत्येकाला वाद हवा आहे. आदित्य (मुलगा आदित्य नारायण) शांतपणे जगतो, तो वादाच्या भोवऱ्यात अडकत नाही. मी स्टेजवर गात असताना वेडेपणा करतो. चाहते माझ्यावर प्रेम करतात, मला वाटते की त्यांना आनंदी होऊ द्या. अन्यथा, या प्रकारचे लोक आम्ही मुळीच नाही आहोत. आम्हालाही त्यांना खुश करावे लागते”. त्यानंतर उदित नारायणने महिलेला ओठांवर किस करण्याच्या प्रकाराबाबत सांगितले, “मी बॉलिवूडमध्ये गेली ४६ वर्षे काम करत आहेत, माझी प्रतिमा अशी कधीच नव्हती की मी चाहतायची जबरदस्ती किस घेईन . खरं तर, जेव्हा मी माझ्या चाहत्यांना माझ्यावर प्रेम करताना पाहतो तेव्हा मी हात जोडतो”.