Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत मुंबई पोलीस अत्यंत सतर्क असून पूर्ण सतर्कतेने तपास करत आहेत. हल्लेखोर अद्याप पकडला गेला नसून पोलिसांनी त्याच्यासाठी ३५ टीम तयार केल्या आहेत. अलीकडेच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताची झलक दिसली, ज्यामध्ये तो पिवळा शर्ट घातलेला दिसत होता. आता पोलिसांना आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, जे घटनेच्या चार दिवस आधीचे आहे. यामध्ये संशयित वर्सोवा येथील एका घरातील शूज रॅकमधून शूज आणि चप्पल चोरताना दिसत आहे. यावेळी चोराने पांढरा शर्ट घातला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
१५ जानेवारीला पहाटे २.३० वाजता हल्लेखोर सैफच्या घरात घुसला आणि त्याच्यावर धारदार चाकूने सहा वार केल्याची माहिती आहे. यामध्ये सैफवर सहा वेळा वार करण्यात आले. यामुळे त्याला सर्वात खोल जखम पाठीच्या कण्याजवळ होती. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन सैफच्या मणक्यातील अडीच इंची चाकूचा तुकडा बाहेर काढला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि त्याच दिवशी तीन संशयितांना अटक केली. पोलिसांचे एक पथकही सैफच्या घरी पोहोचले आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांनी घटनेच्या दिवशी (१६ जानेवारी) एका आरोपीला पकडले होते, तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पूर्ण सतर्कतेने सुरु आहे.

घटनेच्या काही तासांनंतर हल्लेखोराचा फोटो समोर आला असून तो सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसत आहे. पकडले जाऊ नये म्हणून तो आपला वेश बदलताना दिसला होता. एवढेच नाही तर सैफवर हल्ल्याची घटना घडवून आणण्यापूर्वी तो १६ जानेवारीला सकाळी ८ वाजता वांद्रे पोलीस ठाण्याभोवती घिरट्या घालताना दिसला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दादर येथील कबुतरखाना परिसरात भेट देऊन ‘इकरा’ नावाच्या मोबाईल शॉपीतील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. सैफवरील हल्ल्यानंतर १६ जानेवारीची ही गोष्ट आहे, ज्यामध्ये संशयास्पद दुकानातून हेडफोन्स खरेदी करण्यात आले होते.
आणखी वाचा – अमिताभ बच्चन व ऐश्वर्या रायबरोबरच्या तुलनेबाबत अभिषेक बच्चन स्पष्टच बोलला, लेक आराध्याकडून आहेत ‘या’ अपेक्षा

या प्रकरणी करीना कपूर खानने पोलिसांत जबाब नोंदवला. पोलिस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचून तिची जबानी घेतली. करिनाने पोलिसांना सांगितले की, संशयित अतिशय आक्रमक होता. त्याने सैफवर सतत हल्ला केला. तो जहांगीरच्या (जेह) खोलीत शिरला होता. मध्येच सैफ आल्याने हल्लेखोर जेहपर्यंत पोहोचू शकला नाही. हल्लेखोर तिच्या धाकट्या मुलावर हल्ला करणार आहे असे तिला वाटले होते, असेही करीना म्हणाली. त्यामुळे हल्ला झाला तेव्हा लहान मुले आणि महिलांना बाराव्या मजल्यावर पाठवण्यात आले. त्याने घरातून कोणतीही चोरी केली नाही.