Priyanka Chopra Fees For SSMB29 : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा. बर्याच काळापासून प्रियांका हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. आजवर प्रियांकाने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्री शेवटची २०१९ला प्रदर्शित झालेल्या ‘स्काई इज पिंक’ या चित्रपटात दिसली. आता ती तब्बल सहा वर्षानंतर बॉलिवूडमध्ये परत जाण्याची तयारी करत आहे. प्रियंकाने अलीकडेच एसएस राजामौलीच्या चित्रपटासाठी सही केली आहे. यासाठी, तिने अधिक मानधन घेतलं आहे, त्यानंतर ती भारताची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. प्रियंका चोप्राने एसएस राजामौलीच्या ‘SSMB29’ चित्रपट साईन केला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने या चित्रपटासाठी ३० कोटी रुपये आकारले आहेत. या शुल्कासह, प्रियंकाने भारतातील सर्वाधिक रक्कम आकारणार्या अभिनेत्रींच्या यादीच्या शीर्षस्थानी स्थान मिळविले आहे.
एसएस राजामौलीचा ‘SSMB29 ‘ ही एक अॅक्शन-अॅडव्हेंचर फिल्म आहे. चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू प्रियांका चोप्राच्या बाजूने दिसणार आहेत. याशिवाय जॉन अब्राहम या चित्रपटात दिसणार आहे अशी बातमी आहे. वेगवेगळ्या माध्यमांच्या वृत्तानुसार, जॉन अब्राहमने राजामौलीच्या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनची जागा घेतली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जॉन आणि प्रियांका १७ वर्षानंतर एकत्र पडद्यावर दिसतील. यापूर्वी दोघेही 2008 मध्ये ‘दोस्ताना’ चित्रपटात एकत्र दिसले होते.
आणखी वाचा – रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, हळदी समारंभात होणाऱ्या पत्नीसह थिरकताना दिसला, व्हिडीओ समोर
प्रियंका चोप्रा नंतर, दीपिका पादुकोण सर्वाधिक फी घेणार्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. दीपिका तिच्या चित्रपटांसाठी १५-३० कोटी आकारते. तर कंगना रनौत १५ ते २७ कोटींच्या फीसह तिसर्या क्रमांकावर आहे. कतरिना कैफ १५ ते २५ कोटींच्या रकमेसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि आलिया भट्ट या यादीमध्ये १० ते २० कोटी रुपयांच्या मानधनासह पाचव्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा – वाढदिवशी सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “खूप आठवण येतेय आणि…”
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून ती हैदराबादमध्ये आहे. निक जोनास बरोबर लग्न केल्यानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली होती. अभिनेत्री अधूनमधून भारतात येत असते. ती एसएस राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटात काम करणार असल्याचे वृत्त आहे. हा नवीन अध्याय सुरु करण्यापूर्वी, अभिनेत्रीने श्री बालाजी मंदिराला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले होते.