Indira Krishnan Shares An Incident : बॉलिवूड मधील कलाकारांना कास्टिंग काऊचची शिकार ही व्हावंच लागलं आहे. बर्याच अभिनेत्रींनी त्यांचे वाईट अनुभव शेअर केले आहेत. आता अलीकडेच, चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी या उद्योगाबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. त्याच वेळी, ती सिनेविश्वातील लोकांनी दिलेल्या कास्टिंग काऊचच्या ऑफरबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. अभिनेत्रीने सांगितले की हिंदी सिनेविश्वाच्याच्या तुलनेत तिला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अशा प्रकारच्या अनुभवांचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री म्हणजे इंदिरा कृष्णन.
इंदिरा कृष्णन यांनी नुकताच ‘बॉलिवूड बबल’शी संपर्क साधला. यावेळी बोलताना त्यांनी कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, “मला हे फक्त एकदाच नाहीतर, अनेकदा जाणवलं आहे. विशेषतः मी असं म्हणणार नाही की, हे हिंदी चित्रपट इंडस्ट्री किंवा मुंबईत जास्त वेळा घडलं तर साऊथमध्येही मला असे धक्कादायक अनुभव आले आहेत. मला एका बड्या चित्रपट निर्मात्यानं एका खूप मोठ्या प्रोजेक्टसाठी निवडलेलं. त्या प्रोजेक्टबाबत आमचे काही मतभेद होते. मी त्या प्रोजेक्टसाठी पूर्णपणे तयार होते, पण शेवटच्या क्षणी, जसं अनेक वेळा घडतं, एका छोट्याशा गोष्टीनं संपूर्ण नातं खराब केलं. फक्त एक ओळ, एक वाक्य आणि ते सर्व काही संपलं. मला आठवतंय की, मला आधी वाटलेलं की, हा चित्रपट माझ्या हातून निसटला आहे”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मग घरी पोहोचल्यानंतर मी त्याला मॅसेज टाईप केला, कारण तो ज्या पद्धतीनं बोलत होता, त्याची देहबोली आणि त्याच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. याचबरोबर दबावही वाढू लागला. मला वाटलं की, मी ही परिस्थिती हाताळू शकणार नाही. मी विचार केला की, जर उद्यापासून शूटिंग सुरु झालं आणि हे सारंच बिघडलं तर काय होईल? मी खूप आदरानं म्हणाले की, मी माझी प्रतिभा विकायला आले आहे, स्वतःला नाही. कदाचित माझे शब्द थोडे कठोर असतील, पण मला वाटलं की, तुम्ही जितके स्पष्ट असाल तितकं चांगले होईल. यामुळे तुम्हाला तुमचा वेग टिकवून ठेवण्यास, ऊर्जा वाढवण्यास आणि पुढे जाण्यास मदत होते”.
आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! विधीदरम्यानचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, पण होणारा नवरा कोण?
शेवटी इंदिराजी म्हणाल्या, “कास्टिंग काऊचची ही पहिली किंवा शेवटची घटना नव्हती. यामुळे मी काही चांगले प्रोजेक्ट गमावले. करिअरसाठी ती टेलिव्हिजनकडे वळली, तेव्हा हा टर्निंग पॉईंट होता. छोट्या पडद्यानं मला माझ्या क्षमता चांगल्या प्रकारे दाखवण्यास मदत केली. तसेच, मला तिथे पुरेसा आदर मिळाला. हो, मी ऐकलं आहे की, टीव्ही इंडस्ट्रीमध्येही अशा अनेक गोष्टी घडतात. पण मला वाटतं त्यावेळी, आपल्या सर्वांनाच याचा सामना करावा लागला होता”.





