शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चेक बाऊन्स प्रकरणात राम गोपाल वर्मा दोषी, तीन महिन्यांची शिक्षा होणार, नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2025 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood director Ram Gopal Varma sentenced to three months in the check bounce case

चेक बाऊन्स प्रकरणात राम गोपाल वर्मा दोषी, तीन महिन्यांची शिक्षा होणार

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राम गोपाल वर्मा अडचणीत आले असून या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे म्हटलं जात आहे. चेक बाऊन्स प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्माला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या ‘सिंडिकेट’ या नव्या प्रकल्पाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला. मंगळवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. मात्र, राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. (ram gopal varma convicted in cheque bounce case)

यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिग्दर्शकाविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट (NBW) जारी करण्याचे आदे,ram gopal Varma cheque bounce casesमाखाली दंडनीय गुन्हा आहे. याप्रकरणी राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला ३.७२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा त्यांना तीन महिन्यांची साधी शिक्षा भोगावी लागेल.

“ONLY MAN CAN BE THE MOST TERRIFYING ANIMAL “

In CONTINUATION to my CONFESSION note on SATYA film , I DECIDED to make the BIGGEST film ever

The film is called SYNDICATE

It’s about a terrifying organisation which threatens the very EXISTENCE of INDIA

The CONCEPT

STREET…

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 22, 2025

आणखी वाचा – “हे गांभीर्याने घ्या नाहीतर…”, राजपाल यादव व रेमो डिसुझासह सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पाकिस्तानातून धमकी, नेमकं प्रकरण काय?

२०१८ मध्ये श्री नावाच्या एका कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत चेक बाऊन्सचा खटला दाखल केला होता. हा खटला वर्मा यांच्या फर्मविरोधात होता. वॉरंट जारी झालेल्या या प्रकरणात जून २०२२ मध्ये वर्मा यांना न्यायालयाने ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. ज्या गुन्ह्यात राम गोपाल यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्टच्या कलम १३१ अंतर्गत येतो, ज्या अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा – Video : ‘नवरी मिळे हिटलरला’च्या सेटवर क्रिकेटचा खेळ, लीलाच्या सासूची दमदार बॅटिंग, व्हिडीओ समोर

दरम्यान, या वादात राम गोपाल वर्मा यांचे नाव त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेबाबतही चर्चेत राहिले. राम गोपाल यांच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘सिंडिकेट आहे’, ज्याची घोषणा राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरुन केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी २०२२ मध्ये एकदा चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मिळाल्याचे सांगितले आहे.

Tags: ram gopal varmaram gopal varma cheque bounce caseram gopal varma convicted in cheque bounce case
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Vicky Kaushal Helps  Rashmika Mandanna

Video : विकी कौशलच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सगळ्यांची मनं, पायाला दुखापत झालेल्या रश्मिका मंदानाला दिला मदतीचा हात, कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.