रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांची खास उपस्थिती, जान्हवी कपूर पोहोचली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 28, 2024 | 11:32 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Marchant pre-wedding function

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांची खास उपस्थिती, जान्हवी कपूर पोहोचली अन्...

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. हा कार्यक्रम १ मार्च ते ३ मार्च दरम्यान गुजरात येथील जामनगर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी सुमारे २२०पेक्षा अधिक पंचपक्वान्न ठेवण्यात येणार आहे. राधिका व अनंत यांचा कार्यक्रम गुजरातमधील जामनगर येथे पार पडणार असून बॉलिवूड तसेच सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (Anant Ambani and Radhika Marchant pre-wedding function)

राधिका व अनंत यांचा लग्न सोहळा हा भारतातील आतापर्यंतचा श्रीमंत सोहळा ठरु शकतो. अनंत व राधिका हे दोघेही १२ जुलै २०२४ रोजी लगनबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अंबानी कुटुंबाने लग्नाआधीचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी जामनगर येथे रिलायन्स ग्रीन कॉम्प्लेक्स येथे मोठा सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडसहित हॉलिवूडमधीलही अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – तब्बल २५ शेफ अन् २५०० पदार्थ; अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधींमधील खाद्यपदार्थ ठरणार लक्षवेधी

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंह, दीपिका पदूकोण, सलमान खान, जान्हवी कपूर, करण जोहर यांची उपस्थिती या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना असणार आहे. तसेच क्रीडा विश्वातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, अभिनव बिंद्रा ही मंडळी सहभागी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उद्योग विश्वातील टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन्, आदित्य बिर्ला समूहाचे के. एम. बिर्ला, अदानी समूहाचे गौतम अदानी व भारती एअरटेलचे सुनील भारती यांची उपस्थिती असू शकते, अशी प्राथमिक माहिती आहे.

आणखी वाचा – Video : धमाकेदार एन्ट्री घेत तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेचा भन्नाट डान्स, साध्या लूकमध्ये दिसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाचे स्वरुप समोर आले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे १ मार्चला ‘ॲन इव्हिनिंग इन एव्हरलँड’ थीम आहे. या दिवशी ‘एलिगंट कॉकटेल’ असा ड्रेस कोड असून यामध्ये संगीत, नृत्य व काही खास परफॉर्मन्सचा समावेश असणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी ‘अ वॉक ऑन द वाइल्डसाइड’ ही थीम असणार असून या दिवशीचा ड्रेस कोड ‘जंगल फिव्हर’ आहे आणि तिसऱ्या दिवशी ‘हस्ताक्षर’ अशी थीम असून यामध्ये आलेल्या पाहुण्यांचे संगीत व नृत्याने मनोरंजन करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता राधा कृष्ण मंदिरात हस्ताक्षर सोहळा साजरा केला जाणार आहे. या दिवशीचा ड्रेस कोड ‘हेरिटेज इंडियन’ असणार आहे.

Tags: anant ambaniattend to functionscelebritiespre-wedding functionradhika marchant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Ashok saraf rutuja bagwe and devki pandit announced sangeet natak akademi award see the details

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानंतर अशोक सराफ यांचा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने सन्मान, देवकी पंडीत व ऋतुजा बागवे यांचाही गौरव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.