साऊथ सुपरस्टार रजनीकांत सध्या खूप चर्चेत आले आहेत. त्यांनी आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीमध्ये त्यांना खूप आदराचे स्थान आहे. तसेच देशभरात त्यांचे अधिक चाहते आहेत. आज म्हणजे १२ डिसेंबरला रजनीकांत यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्या ७४ व्या वाढदिवसांच्या मदुरी येथील थिरुमंगलममध्ये ‘अरुल्मिगु श्री रजनी मंदिरात मेगास्टार रजनीकांत यांच्या नवीन मूर्तीचे अनावनरण केले आहे. ‘मपिल्लई’ या चित्रपटातील पात्राची ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. मात्र हे बघून अनेकांना रागदेखील आला आहे. असं नक्की काय घडलं की लोकांना राग आला? याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (rajinikanth birthday special)
एक सेवानिवृत्त सेना अधिकारी कार्तिक यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. नंतर रजनीकांतच्या चाहत्यांनी पूजा करण्यास सुरुवात केली होती. त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रार्थना व पूजा तसेच सेवा सुरु आहेत. मंदिरात मूळ रुपात कार्तिक यांच्या घरी घरातील वरील खोलीत रजनीकांत यांचे फोटों व मूर्ती होत्या. या वर्षी रजनीकांत यांच्या ७४ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, ‘मप्पिल्लई’ चे त्यांचे पात्र हे ३ फुट उंच, ३०० किलोग्राम यांची एक प्रतिमेला जुन्या मूर्तीच्या स्थानी ठेवले आहे.
#WATCH | Tamil Nadu | Ahead of his 74th birthday on Thursday, December 12, a new statue of Actor Rajinikanth has been unveiled at the "Arulmigu Sri Rajini Temple" in Thirumangalam, Madurai.
— ANI (@ANI) December 11, 2024
The statue depicts Rajinikanth's iconic character from the movie 'Mappillai', honouring… pic.twitter.com/cVgTAlHenK
एएनआयबरोबर बोलताना कार्तिक यांनी सांगितले की, “रजनीकांत यांच्या ७४ व्या जन्मदिनानिमित्त सुपरस्टार रजनीकांत यांची ३ फुट ऊंच, ३०० किलोग्रामची मूर्तीचे अनावरण केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रजनीकांत यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती.त्यांची मनोभावे पूजादेखील करण्यात आली. रजनीकांत यांना भेटायची खूप इच्छा आहे. वाढदिवसाच्या रजनीकांत यांना खूप शुभेच्छा”.
दरम्यान या सगळ्या प्रकरणावर अनेकांना वाईटदेखील वाटलं आहे. मूर्तीवर इतकं सारं दूध वाया घावल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकं सारं दूध वाया जात आहे ही नासाडी कोणाला दिसत नाही का? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ते दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा पहिला चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेट्टयां’ असे चित्रपटाचे नाव असून यामध्ये त्यांच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील शहनशाह अमिताभ बच्चनदेखील दिसणार आहेत.